प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत लालफितीतच

By Admin | Updated: May 13, 2015 23:59 IST2015-05-13T23:59:14+5:302015-05-13T23:59:14+5:30

पालघर पूर्व आदिवासी जंगलपट्टी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र दुर्वेस मागील सहा वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या लहान खोल्यांत सुरू आहे.

The building of the Primary Health Center | प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत लालफितीतच

प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत लालफितीतच

स्थायी समिती सभा : पदाधिकाऱ्यांचे अवमान केल्याप्रकरणी निषेध
अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगाव गाव तलावाच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे नियोजन केल्यानंतरही याठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष व आमदार ९ मे रोजी पोहोचले. मात्र जिल्हा परिषद सिंचन विभागाचे अधिकारी या कार्यक्रमाकडे फिरकलेच नसल्याने पदाधिकाऱ्यांचा अवमान करणाऱ्या सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय असे कृत्य करणाऱ्या या अधिकाऱ्याचा निषेधही जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत करण्यात आला आहे.
लोहगाव येथे गावतलाव दुरुस्तीचे सुमारे ५५ लक्ष रुपयांचे काम जिल्हा परिषदेने मंजूर केले आहे. या कामाचा भूमिपूजन सोहळा जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके यांनी ९ मे रोजी आयोजित करण्याबाबत सिंचन विभागाला लेखी स्वरुपात कळविले होते. त्यानुसार या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार वीरेंद्र जगताप व जिल्हा परिषदचे सदस्य भूमिपूजन स्थळी पोहचले. मात्र या कार्यक्रमाचे नियोजित ठरलेले धोरण बाजूला सारत सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता पी.पी. पोटदुखे व अन्य अधिकारी नियोजित ठिकाणी पोहचले नाही.
दरम्यान भूमिपूजन सोहळ्याला मला यायचे असल्याचा मोबाईलवर निरोप कार्यकारी अभियंता पोटदुखे यांना पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याकडून मिळाला असल्याने त्यांनी या कार्यक्रमाला जाण्याचे टाळले. परंतु पालकमंत्र्यांच्या या निरोपाबरोबर साधी कल्पनाही अध्यक्ष व उपस्थित लोकप्रनिधींना देण्यात आली नाही. त्यामुळे भूमिपूजनासाठी पोहोचलेले लोकप्रतिनिधी अधिकारीच उपस्थित नसल्यामुळे ताटकळत बसले होते.
दरम्यान हा मुद्दा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख यांनी बुधवारी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत उपस्थित करीत सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व आमदारांचा तसेच सभागृहाचा अवामान केला आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी सभागृहात केली.
यासंदर्भात सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय स्थायी समितीत घेण्यात आला. याशिवाय बांधकाम विभागाचे दर्यापूर येथील उपअभियंता ठाकरे यांनी ज्या कंत्राटदारांची कामे निकृष्ट असल्याने सांगितले होते, त्याच अभियंताने काही दिवसांत ही कामे चांगली झाल्याचे प्रमाणपत्र दिले. मात्र आता देयके काढण्यास कुचराई करीत आहेत.
पैसे घेऊनही अधिकारी असे कृत्य करीत असल्याचा आरोप बबलू देशमुख यांनी केला आहे. यासंदर्भातही चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी.जी. भागवत यांना देण्यात आले आहे. यावेळी इतरही विषयांवर सभेत चर्चा करुन निर्णय घेण्यात आले.
सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, अरुणा गोरले, सरिता मकेश्वर, काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख, सदस्य प्रमोद वाकोडे, अभिजित ढेपे, चित्रा डहाणे, सीईओ अनिल भंडारी, डेप्युटी सीईओ के.एम. अहमद, जे.एम. आभाळे, खातेप्रुख पी.जी. भागवत, श्वेता बॅनर्जी, एस.एम: पानझाडे, चंद्रशेखर खंडारे, सी.आर. राठोड, उदय काठोडे व अन्य अधिकारी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)

Web Title: The building of the Primary Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.