शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

अमरावती येथील इमारत कोसळली, पाच ठार, एक गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 06:17 IST

सपोर्ट देणारे छत कोसळले

अमरावती : येथील प्रभात चौकातील  राजेंद्र लॉजच्या दुमजली इमारतीचे छत कोसळून तळमजल्यावरील दुकानाच्या व्यवस्थापकासह चार मजुरांचा दबून मृत्यू झाला. रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास व्यवस्थापकाचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर मदतकार्य अविरत सुरू होते.

मलब्याखाली दबलेले चार मृतदेह एनडीआरएफच्या चमूने बाहेर काढले. रवी परमार (४२, साईनगर), असे मृत व्यवस्थापकाचे नाव आहे, तर मो. कमर ऊर्फ कम्मू इक्बाल मो. रफिक (३५, रहमतनगर), मो. आरीफ शेख रहीम (३५, रा. रहमतनगर) व रिजवान शाह शरीफ शेख (२०, उस्माननगर, लालखडी), अशी मृतांची नावे आहेत. 

टेकू द्यायला गेले अन्... 

राजदीप एम्पोरियमचे व्यवस्थापक रवी परमार हे रविवारी पहाटे मुंबईहून अमरावतीला परतले. मजुरांसह त्यांनी सकाळी राजदीप एम्पोरियमच्या डागडुजीस सुरुवात केली. वरच्या राजेंद्र लॉजचे छत कोसळू नये म्हणून सपोर्ट देण्याचे काम सुरू होते. 

राजेंद्र लॉजसह त्या इमारतीतील एकूण सहाही दुकानांना नोटीस दिल्या होत्या. पैकी लॉजच्या पहिल्या मजल्यावरील बांधकाम पाडण्यात आले, तर पाच दुकानांनी त्वरित डागडुजी करून घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, ती करताना पुरेशी सजगता बाळगली गेली नसल्याचे सकृत्दर्शनी दिसून आले. - सुहास चव्हाण, उपअभियंता, राजापेठ झोन, महापालिका

टॅग्स :AmravatiअमरावतीBuilding Collapseइमारत दुर्घटना