शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

इमारतबळी प्रकरण: पालिकेच्या त्या अभियंत्यांना दिलासा नाहीच, न्यायालयाने बेल नाकारली; आता अटकेसह निलंबनही!

By प्रदीप भाकरे | Updated: January 6, 2023 18:26 IST

तब्बल ५० दिवसांपासून सुनावणीसाठी ‘तारिख पे तारीख’ मिळत असताना गुरूवारी सायंकाळी न्यायालयाने अंतिम निर्णय देताना अभियंत्यांना दिलासा दिला नाही. त्यामुळे आता सुहास चव्हान व अजय विंचुरकर यांना उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागणार आहेत.

अमरावती: प्रभातचौकस्थित राजेंद्र लॉज इमारतबळी प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या महापालिकेच्या दोन्ही अभियंत्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज स्थानिक न्यायालयाने फेटाळला. गुरूवारी सायंकाळी तो निर्णय देण्यात आला. ‘बेल’ नाकारली गेल्यामुळे त्या दोन्ही अभियंत्यांवर आता अटकेची टांगती तलवार आहे. सोबतच, अटक झाल्यास महापालिका सेवेतून निलंबनाची कुऱ्हाड देखील त्यांच्यावर कोसळणार आहे.

तब्बल ५० दिवसांपासून सुनावणीसाठी ‘तारिख पे तारीख’ मिळत असताना गुरूवारी सायंकाळी न्यायालयाने अंतिम निर्णय देताना अभियंत्यांना दिलासा दिला नाही. त्यामुळे आता सुहास चव्हान व अजय विंचुरकर यांना उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागणार आहेत. तशी तयारी त्यांनी चालविली असून, सोमवारी त्यांच्यावतीने नागपूर खंडपिठात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला जाईल, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली. 

३० ऑक्टोबर रोजी दुपारी प्रभात चौक स्थित राजेंद्र लॉजची अतिशिकस्त इमारत कोसळून पाच जणांचा बळी गेला. त्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी राजापेठ झोनचे उपअभियंता सुहास चव्हाण व अजय विंचूरकर यांना आरोपी केले. मात्र, गुन्हा दाखल झाल्याची पूर्वसूचना मिळताच दोघेही ११ नोव्हेंबरपासून रफूचक्कर झालेत. त्यांना अटक करण्यात शहर कोतवाली पोलिस अपयशी ठरल्याने तो तपास खोलापुरी गेटचे ठाणेदार गजानन तामटे यांच्याकडे वर्ग करण्यात आला. 

मात्र दोन्ही अभियंत्यांना अटक करण्यात तामटे यांना अपयश आले. तर दुसरीकडे ते दोघेही ५०/ ५५ दिवसांपासून भूमिगत आहेत. ते खोलापुरी गेट पोलिसांना सापडू शकले नाहीत. त्यामुळे ते दडले तरी कुठे, असा सवाल उपस्थित झाला आहे. दरम्यान, स्थानिक न्यायालयाने अटकपुर्व जामीन नाकारल्याने ते दोघे खोलापुरी गेट पोलिसांना गवसल्यास त्यांना अटक करण्यात येईल. तसे झाल्यास महापालिका प्रशासनाकडूनही त्या दोघांवर निलंबनाची कारवाई होऊ शकते.

असे आहेत पर्याय -विधीतज्ञानुसार, स्थानिक न्यायालयाच्या अटकपुर्व जामीन नाकारल्याचा आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात आव्हान देण्याचे ‘लिगल ऑप्शन’ चव्हान, विंचुरकरांकडे उपलब्ध आहे. तोपर्यंत त्या दोघांनाही फरारीत राहावे लागेल. तर, दुसरीकडे कोतवाली वा तपासाची धुरा असलेल्या खोलापुरी गेट पोलिसांकडे ते आत्मसमर्पण देखील करू शकतात. ते नेमका कुठला पर्याय निवडतात, हे सोमवारी स्पष्ट होईल.

महापालिकेचे उपअभियंता सुहास चव्हान व कनिष्ट अभियंता अजय विंचुरकर यांचा अटकपुर्व जामीन अर्ज स्थानिक न्यायालयाने गुरूवारी सायंकाळी फेटाळला. त्यांना अटकपुर्व जामीन देण्यात यावा, ते तपासात सहकार्य करतील, अशी हमी वजा भूमिका पालिका प्रशासनाने न्यायालयासमोर मांडली होती.श्रीकांत चव्हान, विधी अधिकारी, महापालिका 

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस