बिल्डर राजेश शिरभातेला ग्राहक मंचाचा दणका

By Admin | Updated: October 20, 2016 00:15 IST2016-10-20T00:15:32+5:302016-10-20T00:15:32+5:30

मे. गजानन कन्स्ट्रक्शन कंपनीचे भागीदार राजेश बाबाराव शिरभाते यांच्याविरुध्द ग्राहक मंचाने अटक वॉरंट जारी केला आहे.

Builder Rajesh Shirbathe customer banner | बिल्डर राजेश शिरभातेला ग्राहक मंचाचा दणका

बिल्डर राजेश शिरभातेला ग्राहक मंचाचा दणका

फ्लॅटस् स्किमसंदर्भात तक्रार : तक्रारकर्त्याला १५ हजारांची नुकसान भरपाई
अमरावती : मे. गजानन कन्स्ट्रक्शन कंपनीचे भागीदार राजेश बाबाराव शिरभाते यांच्याविरुध्द ग्राहक मंचाने अटक वॉरंट जारी केला आहे. तसे पत्र फे्रजरपुरा ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाला पाठविण्यात आले.
शिरभाते यांनी कॅम्प येथे जय गजानन रेसिडेंसी या नावाने फ्लॅट योजना सुरु केली होती. त्यामध्ये ग्राहकांना सर्व सुखसोयी पुरविण्याचे व मुदतीच्या आत बांधकाम करण्याचे आश्वासन दिले होते. त्याकरिता ग्राहकांकडून मोठी रक्कम गोळा केली. मात्र, त्यांनी वेळेवर बांधकाम पूर्ण केले नाही. तसेच सुविधा सुध्दा पुरविल्या नाही. यासंदर्भात सिमा निखील मेंडसे यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाचा निकाल ग्राहक मंचाने दिला असून त्यामध्ये अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केल्याचे ग्राह्य धरून शिरभाते यांना तक्रारकर्त्यांच्या फ्लॅटबाबत बॅकेंचे ना देय प्रमाणपत्र आणुन देण्याचे आदेश दिले तसेच नुकसान भरपाई म्हणून १५ हजार रुपये देण्याचे निर्देश दिले आहे. (प्रतिनिधी)

आदेशाचे पालन न केल्याने अटक वॉरंट जारी
ग्राहक न्यायालयाने गैरअर्जदार शिरभाते यांना तक्रारकर्त्यांना एनओसी तसेच नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. मात्र शिरभाते यांनी ग्राहक न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे त्यांचेविरुध्द अटक वॉरंट जारी केला होता.

Web Title: Builder Rajesh Shirbathe customer banner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.