पुलाचे बांधकाम त्वरित करा !
By Admin | Updated: August 7, 2016 00:12 IST2016-08-07T00:12:33+5:302016-08-07T00:12:33+5:30
वेणी गणेशपूर ते खंडाळा मार्गावरील रखडलेल्या पुलाचे बांधकाम त्वरित पूर्ण करा व त्या पुलावरून पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना त्वरित आर्थिक मदत द्या,...

पुलाचे बांधकाम त्वरित करा !
नागरिकांची मागणी : मृताचे कुटुंबीयांना आर्थिक मदत द्या
नांदगाव खंडेश्वर : वेणी गणेशपूर ते खंडाळा मार्गावरील रखडलेल्या पुलाचे बांधकाम त्वरित पूर्ण करा व त्या पुलावरून पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना त्वरित आर्थिक मदत द्या, या मागणीसाठी शनिवारी खंडाळा व वेणी (गणेशपूर) येथील शेकडो नागरिक तहसील कार्यालयावर धडकले. या मागणीचे निवेदन शिवसेनेचे प्रमोद कठाळे यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना निवेदन सादर केले.
वेणी गणेशपूर येथून नांदगावच्या शाळेत जाणारे विद्यार्थी, तसेच मंगरुळ चवाळा येथील नागरिक व मजूर याच पुलावरून रोज जाणे-येणे करतात. खंडाळा येथील गजानन अंबाडरे हा या बाजूने जात असताना पावसामुळे नाल्याच्या पुरात पाय घसरून पडला. व पुरात वाहात जाऊन त्याचा जीव गेला.
अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये, यासाठी या अर्धवट पुलाचे बांधकाम त्वरित पूर्ण करा व त्या मृताच्या कुटुंबीयांना त्वरित आर्थिक मदत करा. यासाठी वेणी व खंडाळ्याचे शेकडो नागरिक तहशील कार्यालयावर धडकले व त्यांनी तहशीलदारांना निवेदन सादर केले.
यावेळी शिवसेनेचे प्रमोद कठाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रमोद ठाकरे, नगरसेवक अरूण लहाबर, विजय ठाकरे, अशोक जोगे, राजू जगताप, रामराव अंबाडरे, श्रीकांत तिडके, मिलिंद ठाकरे, ज्ञानेश्वर अंबाडारे, निकेत ठाकरे, रमेश थुरभलाई, सुनील ठाकरे, विजय ठाकरे, अविनाश ठाकरे, दीपक गावंडे, भाष्कर काळे, दिगांबर आमडारे, ज्ञानेश्वर आमडारे, नासिर खॉ पठान, नितेश जोगे व वेणी गणेशपूरचे नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)