बी.टी.च्या १० लाख पाकिटांची मागणी
By Admin | Updated: May 12, 2015 00:16 IST2015-05-12T00:16:49+5:302015-05-12T00:16:49+5:30
यंदाच्या खरीप हंगामामध्ये ७ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली प्रस्तावित आहे. या क्षेत्रात विविध पिकांकरिता १ लाख २७ ...

बी.टी.च्या १० लाख पाकिटांची मागणी
खरीप महिन्यावर : यंदा पिकांसाठी लागणार सव्वा लाख क्विंटल बियाणे
गजानन मोहोड ल्ल अमरावती
यंदाच्या खरीप हंगामामध्ये ७ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली प्रस्तावित आहे. या क्षेत्रात विविध पिकांकरिता १ लाख २७ हजार क्विंटल बियाणे लागणार आहेत. यामध्ये सर्वाधिक १ लाख १४ हजार क्विंटल सोयाबीन व संकरित कपाशीची (बी.टी.) ९ लाख ९७ हजार पाकिटे लागणार आहेत. कपाशी व सोयाबीनसह इतर पिकांच्या बियाण्यांची मागणी कृषी विभागाने नोंदविली आहे. जिल्ह्यात ३ लाख २४ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे यासाठी एक लाख १४ हजार क्विंटल बियाणे लागणार आहे. यापैकी ५० हजार क्विंटल बियाण्यांची मागणी महाबीजकडे नोंदविण्यात आली आहे. संकरित कापसाचे (बी.टी.) १ लाख ९९ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून यासाठी ९ लाख ९७ हजार पाकिटे लागणार आहेत. तूर पिकाकरिता १ लाख ९७ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आह तर ४ हजार ७७६ क्ंिवटल बियाण्यांची गरज आहे. यापैकी २ हजार ५०० क्विंटल महाबीजकडून उपलब्ध होणार आहे. मुगाकरिता ३८ हजार ४८३ सर्वसाधारण क्षेत्र आहे. यासाठी १ हजार २६० क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. यापैकी ३०० क्विंटल बियाणे महाबीज कडून उपलब्ध होणार आहे. उडिदाचे ५ हजार ११८ हेक्टर पेरणी क्षेत्र असून २४४ क्विंटल बियाणे लागणार आहे. यापैकी १५० क्विंटल महाबीजकडून उपलब्ध होईल. संकरित ज्वारीकरिता २१ हजार ९०६ हेक्टर पेरणीक्षेत्र प्रस्तावित असून २ हजार क्विंटल बियाणे लागणार आहे. यामध्ये १ हजार ३०० क्विंटल बियाणे महाबीजकडून उपलब्ध होणार आहे. सुधारित कापसाकरिता १० हजार १५० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. याक्षेत्राकरिता ६० क्विंटल बियाण्यांची गरज आहे. बाजरीकरिता ५० हेक्टर क्षेत्र आहे व ६ क्विंटल बियाण्यांची गरज आहे. जिल्ह्यात चिखलदरा व धारणी तालुक्यात धानाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येते. यावर्षी ६ हजार ७४५ हेक्टर पेरणीक्षेत्र आहे. यासाठी २ हजार क्विंटल बियाणे लागणार आहे. यामध्ये एक हजार ३०० क्विंटल बियाण्यांची मागणी महाबीजकडे नोंदविण्यात आली आहे.
अशी तपासावी सोयाबीन बियाण्यांची उगवणशक्ती
सोयाबीनच्या पोत्यामध्ये खोलवर हात घालून मुठभर बियाणे काढावेत. गोणपाटाचे सहा चौकोनी तुकडे घेऊन एक तुकडा जमिनीवर पसरावा, सोयाबीनचे १०० दाणे दीड ते दोन से.मी. अंतरावर १०-१० च्या रांगेत एका तुकड्यावर ओळीत ठेवावेत. अशा प्रकारे तीन नमुने करावे. गोणपाटावर चांगले पाणी शिंपडून ओले करावे व त्यावर दुसरा तुकडा अंथरावा, गोणपाटाच्या तुकड्याची गोल गुंडाळी करुन थंड ठिकाणी ठेवावे. त्यावर अधून-मधून पाणी शिंपडावे, ६-७ दिवसानंतर गुंडाळी जमिनीवर पसरावी. चांगले कोंब आलेले दाणे वेगळे काढावेत, ७० पेक्षा जास्त दाण्याला कोंब आल्यास बियाणे उत्तम समजून एकरी ३० किलो पेरणी करावी. उगवणशक्ती कमी आल्यास तेवढे बियाणे वाढवून द्यावे.
साडेनऊ लाख बी.जी-२ पाकिटांची मागणी
यंदाच्या हंगामात सर्वाधिक ९ लाख ६० हजार पाकिटे बी.जी.-२ कापसाची आहेत. बीजी-१ हे ३७ हजार ५०० पाकीट आहे. ३०२८ व ६५१ वाणाची १५ लाख पाकिटांची मागणी आहे. ७३५१ वाणाची १ लाख पाकिटे, १५५ वाणाच्या बियाण्यांची २ लाख पाकिटांची मागणी आहे. अशा सर्व उत्पादक कंपन्याची ९ लाख ९७ हजार पाकीट बियाण्यांची मागणी आहे.