बीएसएनएल अधिकाऱ्यांचे एक दिवसीय धरणे आंदोलन

By Admin | Updated: September 18, 2014 23:27 IST2014-09-18T23:27:41+5:302014-09-18T23:27:41+5:30

दूरसंचार निगम एक्झिक्युटिव्ह असोसिएशन अमरावती जिल्हा शाखेच्यावतीने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवार १८ सप्टेंबर रोजी भारत दूरसंचार निगम लिमिटेड, श्याम चौक येथील

BSNL officers' day-long protest movement | बीएसएनएल अधिकाऱ्यांचे एक दिवसीय धरणे आंदोलन

बीएसएनएल अधिकाऱ्यांचे एक दिवसीय धरणे आंदोलन

अमरावती : दूरसंचार निगम एक्झिक्युटिव्ह असोसिएशन अमरावती जिल्हा शाखेच्यावतीने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवार १८ सप्टेंबर रोजी भारत दूरसंचार निगम लिमिटेड, श्याम चौक येथील मुख्य कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे देण्यात आले.
बीएसएनएलच्या स्थापणेपासून आजतागायत रखडलेले अधिकारी वर्गाचे प्रलंबित प्रश्न व बीएसएनएलच्या व्यवस्थापनाचे वेळकाढू धोरण याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी जिल्ह्यातील बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी आंदोलन केले. दूरसंचार निगम एक्झिक्युटिव्ह असोसिएशन न्यू दिल्ली यांच्यावतीने प्रत्येक जिल्ह्यातील कार्यालयात धरणे आंदोलन होत आहे.
कंपनी तोट्यात असल्यामुळे बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना योग्य वेतन व पदोन्नती देता येत नाही या व्यवस्थापनेच्या धोरणाला अधिकाऱ्यांचा तीव्र विरोध आहे. दूरसंचार अधिकाऱ्यांना ई-२ प्रमाणे वेतनश्रेणी तसेच उपविभगीय अभियंत्यांना ई-३ प्रमाणे वेतनश्रेणी द्यावी ही अधिकाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. बीएसएनएलमध्ये नियुक्त अधिकाऱ्यांना इतर शासकीय कंपन्याप्रमाणे कालबध्द पदोन्नती द्यावी, कालबध्द पदोन्नतीचा कार्यकाळ ४ वर्षांचा असावा, अधिकाऱ्यांचा वेतनातील तफावत त्वरित दूर करावी. स्थापत्य व विद्युत अभियंत्याना इतर अधिकाऱ्याप्रमाणे पदोन्नती द्यावी तसेच त्यांचे प्रलंबीत प्रश्न त्वरित निकाली काढावे, आदी मागण्यांच्या पुर्ततेसाठी हे आंदोलन पुकारले आहे. आंदोलनामध्ये सतीश काळमेघ, संतोष गांधी, देवनाथ भड, प्रफुल्ल कांडलकर, मनीष माहुरे, नीलेश जिचकार, गजानन शेरेकर, देवीदास पोटे, संजय ढोक, हरीष बागडे, महेंद्र कराळे, ओंकार सोरते, विकास नागठाणे सहभागी होते.

Web Title: BSNL officers' day-long protest movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.