शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

तिवसा येथे घरात घुसून युवकाची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 5:00 AM

घरात शिरून आई-वडील, बहिणीदेखत अज्ञातांनी अजयची हत्या केली. उपस्थित नागरिकांना बंदुकीचा धाक दाखवून आरोपी घटनास्थळाहून पसार झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. पोलीस सूत्रांनुसार, अजय हा रेतीचा व्यवसाय करीत होता. रविवारी दुपारी तो घरी असताना तीन चारचाकी वाहनांतून चौघे आले. घरात शिरून त्यांनी अजयच्या मांडीवर सपासप वार केले.

ठळक मुद्देचाकूने सपासप वार : नागरिकांना दाखविली बंदूक

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : येथील एका २८ वर्षीय तरुणाची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. रविवारी दुपारी ३.३० च्या सुमारास स्थानिक आंबेडकर चौक येथील मृताच्या घरी हा खुनी थरार घडला. अजय बाबाराव दलाल (२५, रा. तिवसा) असे मृताचे नाव आहे.घरात शिरून आई-वडील, बहिणीदेखत अज्ञातांनी अजयची हत्या केली. उपस्थित नागरिकांना बंदुकीचा धाक दाखवून आरोपी घटनास्थळाहून पसार झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. पोलीस सूत्रांनुसार, अजय हा रेतीचा व्यवसाय करीत होता. रविवारी दुपारी तो घरी असताना तीन चारचाकी वाहनांतून चौघे आले. घरात शिरून त्यांनी अजयच्या मांडीवर सपासप वार केले. तेथे उपस्थित असलेल्यांच्या डोक्यावर बंदूक लावून, तुम्ही आडवे येऊ नका, असे बजावत मारेकऱ्यांनी अजयच्या मांडीत चाकू सोडून पळ काढला. अजयच्या आई-वडिलांनी आरोपींना हटकले. त्यांच्याशी वाद घातला. आरोपी अमरावती-नागपूर महामार्गाने पळून गेले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अजयला तिवसा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. इर्विनमध्ये नेताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. तिवसा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.अजयच्या घरी राहणाऱ्या आरिफ नामक युवकाला आरोपींनी पळवून नेल्याची प्राथमिक माहिती आहे. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, एसडीपीओ सोमनाथ तांबे यांनी घटनास्थळाला भेट दिली.

टॅग्स :Murderखून