‘त्याला’ आॅटोच्या फाटकासह उपचाराकरिता आणले

By Admin | Updated: November 9, 2015 01:53 IST2015-11-09T01:53:41+5:302015-11-09T01:53:41+5:30

कार व आॅटोमध्ये झालेल्या भीषण धडकेत आॅटोचालकासह चार जण जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी ३.४५ वाजता

'Brought him to the hospital for treatment.' | ‘त्याला’ आॅटोच्या फाटकासह उपचाराकरिता आणले

‘त्याला’ आॅटोच्या फाटकासह उपचाराकरिता आणले

अमरावती : कार व आॅटोमध्ये झालेल्या भीषण धडकेत आॅटोचालकासह चार जण जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी ३.४५ वाजता बडनेऱ्यात घडली. यामध्ये आॅटोचे दार चालकाच्या पायात फसल्याने त्याला दारासह उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. हे चित्तथरारक दृश्य पाहण्यासाठी रुग्णालयात नागरिकांची एकच गर्दी झाली होती.
आकाश खडसे (३२, रा. वडुरा), गजानन टोपे (३५, रा. यशोदानगर), अभय वैश्य (४०, रा. झिरी, बडनेरा) व राजेंद्र रामलाल कैथवास (४५, साईनगर) अशी जखमींची नावे आहेत. आॅटोचालक आकाश खडसे हा मालवाहू आॅटोत धान्य भरून बडनेरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतून बडनेरा मार्गावर येत होता. दरम्यान बडनेराहून अमरावतीकडे येणाऱ्या कारने आॅटोला जबर धडक दिली.

Web Title: 'Brought him to the hospital for treatment.'