पीआरसी संभाव्य दौऱ्यात ब्रॉडबँड सेवेचा खोडा

By Admin | Updated: September 20, 2015 00:41 IST2015-09-20T00:41:57+5:302015-09-20T00:41:57+5:30

विधिमंडळ सचिवालयाच्या पंचायत राज समितीचा संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमिवर प्रशाकसीय कामकाजात बीएसएनएलच्या ब्रॉड बँड सेवेचा खोडा ...

Broadcast broadband service in PRC probable tour | पीआरसी संभाव्य दौऱ्यात ब्रॉडबँड सेवेचा खोडा

पीआरसी संभाव्य दौऱ्यात ब्रॉडबँड सेवेचा खोडा

फटका : प्रशासकीय कामकाज प्रभावित
अमरावती : विधिमंडळ सचिवालयाच्या पंचायत राज समितीचा संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमिवर प्रशाकसीय कामकाजात बीएसएनएलच्या ब्रॉड बँड सेवेचा खोडा आल्याने प्रशासकीय कामकाज संकटात सापडले आहे. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी सतत भारत दूरसंचार निगमकडे कितीही पाठपुरावा करीत असले तरी या विभागाकडून असहकार्य मिळत असल्याने मिनीमंत्रालतील प्रशासकीय कामकाज सांभाळणारी यंत्रणा चांगलीच हतबल झाली आहे.
विधानमंडळाची पंचायत राज समिती सन २००८/२००९ मध्ये अमरावती जिल्ह्याचे दौऱ्यावर आली होती. यादरम्यान सन २०११/ २०१२ चे लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवाल तसेच सन २०१२/१३ च्या वार्षिक प्रशासन अहवालाच्यासंदर्भात जिल्हा परिषदेला भेट दिली असता त्यावेळी सीईओ यांची साक्ष येत्या आॅक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये घेण्यात येणार आहे. वरील विषयाची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून येत्या ३० सष्टेंबरपर्यंत विधिमंडळ सचिवालयाने मागविली आहे. त्यामुळे मिनीमंत्रालयाची प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. राज्यात सत्ताबदल होताच विधानमंडळाच्या पंचायतराज समिती गठित केली आहे. यामध्ये एकूण १५ आमदारांचा समावेश आहे. विधानमंडळाच्या पंचायत राज समितीचा दौरा म्हटला की प्रशासनात याची सर्वाधिक दखल घेतली जाते. या समितीच्या संभाव्य दौऱ्याचे प्रार्श्वभूमिवर जिल्हा परिषदेतील प्रशासकीय यंत्रणेत लगबग सुरू झाली आहे. .त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागाने याची जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी जिल्ह्यातील १४ पंचायत समितीमार्फत आवश्यक माहिती मागविण्यात आली असून प्राप्त झालेली माहिती 'अपडेट' करण्याची प्रक्रिया जिल्हापातळीवर सुरू झाली असतानाच हे महत्त्वाचे कामकाज प्रशासकीय संगणकावर करण्यासाठी व 'अपडेट' माहितीचे ई-मेल तसेच शासनाकडून येणारे महत्त्वाचे मेल हे मागील आठ दिवसांपासून केवळ भारत दूरसंचार निगमच्या असहकाऱ्यामुळे रखडून पडले आहेत. जिल्हा परिषदेतील ब्रॉड बँड सेवा ठप्प पडल्याने यासर्व गोष्टींचा परिणाम प्रशासकीय कामकाजावर पडला असून पीआरसीच्या संभाव्य दौऱ्यात याची आडकाठी प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या कामकाजात होत आहे.

Web Title: Broadcast broadband service in PRC probable tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.