ब्रिटिशकालीन शकुंतलेला लागली घरघर

By Admin | Updated: August 1, 2015 01:44 IST2015-08-01T01:44:55+5:302015-08-01T01:44:55+5:30

मूर्तिजापूर-अचलपूर धावणारी ब्रिटिशकालीन शकुंतला नॅरोगेज रेल्वे शतकपूर्तीकडे वाटचाल करीत असली तरी

The British's Shakuntala Ghali Gharghar | ब्रिटिशकालीन शकुंतलेला लागली घरघर

ब्रिटिशकालीन शकुंतलेला लागली घरघर

लोकमत विशेष
सुनील देशपांडे अचलपूर
मूर्तिजापूर-अचलपूर धावणारी ब्रिटिशकालीन शकुंतला नॅरोगेज रेल्वे शतकपूर्तीकडे वाटचाल करीत असली तरी ही पुरातन रेल्वे बंद करण्याचा घाट घातला जात असून लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. दोन वर्षांपूर्वी रोडावलेल्या प्रवासी संख्येचे कारण पुढे करीत शकुंतलेचा प्रवास काही दिवसांसाठी थांबविला होता.
अचलपूर-मुर्तीजापूर धावणाऱ्या शकुंतला रेल्वेशी या भागातील जनतेचे भावनिक नाते जुळले आहे. तत्कालीन खासदार सुदामकाका देशमुख ह्यांनी या नॅरोगेज रेल्वेचे ‘शकुंतला’ असे नामकरण केले होते. ब्रिटिशकाळात सुरू झालेली ही रेल्वे आज ९३ वर्षांची झाली आहे. हिचा लोहमार्ग ७५.६४ किलोमिटर असून तो डिसेंबर १९९३ मध्ये ‘ग्रेट इंडियन पेनीन्सूला’ कंपनीने बांधला होता. सेंट्रल रेल्वेची ब्रँच लाईन कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीसोबतचा करार सपुष्टात आल्यानंतर या रेल्वेमार्गाची दुरुस्ती व देखभालीचे कार्य तत्कालीन सेक्रेटरी आॅफ इंडिया यांच्या अधिकार कक्षेत आले. अचलपूर-मुर्तिजापूर रेल्वेमार्गावर चमक, कुष्टा, शिंदी, अंजनगांव, कापूसतळणी, कोकर्डा, लेहगाव, बनोसा, दर्यापूर व मुर्तिजापूर अशी ११ रेल्वेस्थानके आहेत. शकुंतलेला एकूण ५ डबे आहेत. सांस्कृतिक इतिहासातही शकुंतलेचे स्थान अतिशय महत्वाचे आहे. व्यापार व उद्योगांच्या वाढीबाबत ती मैलाचा दगड ठरली होती. परंतु सद्यस्थितीत शकुंतलेचा रेल्वेमार्ग व पूलाची अवस्था अत्यंत दयनिय झाली आहे. या गाडीचा वेग ताशी ३० ते ४० किलोमिटर ठेवण्यात आला असावा. यापेक्षा जास्त वेगाने शकुंतला धावत नाही.

Web Title: The British's Shakuntala Ghali Gharghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.