थोडक्यातील बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:13 IST2020-12-22T04:13:09+5:302020-12-22T04:13:09+5:30
अमरावती : वलगाव मार्गावरील रेल्वे पुलावर सोमवारी सकाळी १० वाजता सुमारास मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दोन्ही बाजूने ...

थोडक्यातील बातम्या
अमरावती : वलगाव मार्गावरील रेल्वे पुलावर सोमवारी सकाळी १० वाजता सुमारास मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दोन्ही बाजूने वाहने उभी झाल्यामुळे वाहनधारकांना तासभर ताटकळत थांबावे लागले.
.....................................................................................
रबीतील हरभरा बहरला
अमरावती : रबी हंगामातील हरभऱ्याचे पीक बहरले आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुक्यांत यंदा हरभरा पिकाची लागवड करण्यात आली. त्यामुळे प्रमुख मार्गालगतच्या शेतात हिरवळ पसल्याचे चित्र दिसून येत आहे.
...........................................
ग्रामीण भागात थंडीचा कडाका वाढला
अमरावती : दोन ते तीन दिवसांपासून ग्रामीण भागात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे गावोगावी सकाळी व सांयकाळी शेकोट्या पेटवून कडाक्याच्या थंडीपासून बचाव केला जात असल्याचे दिसून येत आहे.
.....................................
जिल्हा परिषदेत अभ्यागतांची गर्दी वाढली
अमरावती : जिल्हा परिषदेत विविध कामांसाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची सोमवार या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गर्दी वाढल्याचे चित्र दिसून आले.
............................................................
सीईओंनी घेतला खातेप्रमुखांकडून आढावा
अमरावती: जिल्हा परिषदेच्या विविध विभागाप्रमुखांकडून सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला. शासकीय योजना, विकासकामांची प्रगती व सद्यस्थिती याबाबत सीईओ अमोल येडगे यांनी जाणून घेतले.
.................................................
कृषिपंपाला दिवसा वीजपुरवठा करा
अमरावती : ग्रामीण भागात महावितरण कंपनीकडून दिवस व रात्री भारनियमन केले जाते. त्यामुळे रबी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते. त्यामुळे कृषिपंपालाही दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.