थोडक्यातील बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:16 IST2021-06-16T04:16:54+5:302021-06-16T04:16:54+5:30

अमरावती : ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कामाचा मंगळवारी पंचायत विभागाचे डेप्युटी सीईओ दिलीप मानकर यांनी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व विस्तार ...

Brief news | थोडक्यातील बातम्या

थोडक्यातील बातम्या

अमरावती : ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कामाचा मंगळवारी पंचायत विभागाचे डेप्युटी सीईओ दिलीप मानकर यांनी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्याकडून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला.

...............................................

कठोरा नाक्यावर साचले पाण्याचे डबके

अमरावती : कठोरा नाका ते हर्षराजकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे डबके साचले होते. यामुळे मंगळवारी सकाळी वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागला. दुपारी मात्र रस्त्यावरील पाणी बाहेर काढण्यात आले.

.....................................................

झेडपी आमसभेची तयारी सुरू

अमरावती : जिल्हा परिषदेची आमसभा पुढील आठवडयात होऊ घातली आहे. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने सभेची पूर्वतयारी सुरू केली आहे.

....................................................

पावसामुळे बांधकामाना अडथळा

अमरावती : सध्या पावसाचे दिवस असल्याने इमारत बांधकामाला अडथळा निर्माण होत आहे. सतत पाऊस पडत असल्याने घरांच्या छतावरील स्लॅबचे कामे खोळंबली आहेत.

........................................

खरीप पेरणीच्या कामाला वेग

अमरावती : ग्रामीण भागात खरीप पेरणीच्या कामाला वेग आला आहे. शेतकरी वर्ग सध्या खरीप हंगामातील पेरणीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Web Title: Brief news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.