थोडक्यातील बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:14 IST2021-05-27T04:14:05+5:302021-05-27T04:14:05+5:30
चांदूर बाजार : तालुक्यातील वणी बेलखेडा येथे बुधवारी प्रहारच्यावतीने मोदी सरकारने लागू केलेल्या शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध करण्यात आला. ...

थोडक्यातील बातम्या
चांदूर बाजार : तालुक्यातील वणी बेलखेडा येथे बुधवारी प्रहारच्यावतीने मोदी सरकारने लागू केलेल्या शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी ठिकठिकाणी काळे झेंडे लावून तीव्र संताप व्यक्त केला.
.......................
मालमत्ता करावरील व्याजमाफीला मुदतवाढ द्या
अमरावती : सध्या काेरोनाच्या संकटामुळे सर्व नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे मनपाने मालमत्ता कराच्या व्याजावरील ८० टक्के माफीच्या योजनेला एप्रिल २०२२ पर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी मिलिंद बांबल यांनी महापौर यांच्याकडे केली आहे.
...........................................
जिल्हास्तरीय लोकशाही दिन ऑनलाईन होणार
अमरावती : कोविड-१९ साथीमुळे आगामी जिल्हास्तरीय लोकशाही दिन ऑनलाईन माध्यमांद्वारे घेण्यात येणार आहे. आगामी लोकशाही दिन ७ जून रोजी दुपारी १ वाजता होणार आहे. सदर लाेकशाही दिन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे पार पडणार आहे.
.....................................
जरूड येथे कोविड विलगीकरण कक्ष सुरू
वरुड : तालुक्यातील जरूड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, येथील विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. कोविड- १९ चा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने उपाययोजना म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जरूड येथे विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहे.
..................................................
शीतपेयांची दुकाने बंदच
अमरावती : दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत शीतपेयांची दुकाने शहरात ठिकठिकाणी लावून अनेक जण व्यवसाय करतात. मात्र, कोरोना संकटामुळे शीतपेयांची दुकाने बंद आहेत. त्यामुळे रोजगारही बुडाला आहे.