थोडक्यातील बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:13 IST2021-05-19T04:13:51+5:302021-05-19T04:13:51+5:30
अमराती: गर्ल्स हायस्कूल येथे रस्त्यावर वृक्ष पडल्याने सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. परिणामी येथील कर्मचाऱ्यांना कामे ...

थोडक्यातील बातम्या
अमराती: गर्ल्स हायस्कूल येथे रस्त्यावर वृक्ष पडल्याने सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. परिणामी येथील कर्मचाऱ्यांना कामे करतांना अडचणीचा सामना करावा लागला.
...................................
कठोरा नाक्यावर अँटिजेन चाचण्या
अमरावती : विनाकारण बाहेर फिरणाऱ्या व्यक्तींची कठोरा नाका येथे महापालिकेच्या पथकाने कोरोना चाचणी घेतली. यावेळी पथकात सहभागी कर्मचाऱ्यांनी संचारबंदी मोडून घराबाहेर पडलेल्या नागरिकांना रोखून चाचणीचे नमुने घेण्यात आले.
................................
वित्त विभागाचे कामकाज सुरू
अमरावती: जिल्हा परिषदेचा वित्त विभागाचे कामकाज गत काही दिवसापासून कोरोनामुळे बंद होते. परंतु, शासकीय कामाचे आर्थिक व्यवहार सुरळीत व्हावे, याकरिता वित्त विभागाचे कामकाज सुरू करण्याचे आदेश सीईओंनी दिले होते. त्यानुसार वित्त विभागाचे कामकाज मंगळवारपासून सुरू झाले आहे.
.................................................
‘त्या’ उद्यानाचा कायापालट केव्हा
अमरावती : भातकुली पंचायत समितीच्या आवारात असलेल्या उद्यानाचा विकास करण्यात आला नाही. या ठिकाणी केरकचरा पडून आहे. त्यामुळे या ठिकाणी विकास केव्हा होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
............................
शासकीय वसतिगृहात सन्नाटा
अमरावती; कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शाळा-महाविद्यालये बंद आहेत. परिणामी शासकीय वसतिगृहातही सन्नाटा पसरला असल्याचे चित्र दिसून आले.
.....................................................................
भारनियमानामुळे नागरिक त्रस्त
अमरावती: शहरातील नवसारी व कठोरा नाका परिसरात वेळी-अवेळी वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या उन्हाळयाचे दिवस असल्याने अखंडित वीज पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.