थोडक्यातील बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:13 AM2021-05-16T04:13:15+5:302021-05-16T04:13:15+5:30

अमरावती: युवक कॉंग्रेसच्या वतीने कोरोना बांधित रूग्णालयातील नातेवाईकांना मोफत भाेजन वाटप केले जात आहे.यु.कॉ चे जिल्हाध्यक्ष पकंज मोरे व ...

Brief news | थोडक्यातील बातम्या

थोडक्यातील बातम्या

Next

अमरावती: युवक कॉंग्रेसच्या वतीने कोरोना बांधित रूग्णालयातील नातेवाईकांना मोफत भाेजन वाटप केले जात आहे.यु.कॉ चे जिल्हाध्यक्ष पकंज मोरे व सहकारी गत पंधरा दिवसापासून ही सेवा देत आहेत.

................................................

जिल्हा परिषद सभा बंदच

अमरावती: काेरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हा परिषद मुख्यालयातील आरोग्य व अन्य दोन विभाग वगळता सर्व विभाग बंद आहेत.त्यामुळे सभाही तुर्तास बंद आहेत.

...............................

नागरिकांनो त्रिसूत्री पालक करा

अमरावती: कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांना खबरदारीसाठी नियमित मास्कचा वापर करावा,हात नियमित धुवावे,सामाजिक अंतर पाळावे असे आवाहन एडीएचओ डाॅ.रेवती साबळे यांनी केले आहे.

...................................

कोरोनामुळे उद्यान बंदच

अमरावती: कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शहरातील सर्वच उद्याने सध्याही बंदच आहेत.त्यामुळे उद्यान परिसरात शुकशुकाट असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

..................

शेती मशागतीची कामे सुरू

अमरावती: आगामी खरीप हंगाम जवळ येत असल्याने ग्रामीण भागात शेत मशागतीची कामे सुरू झाली आहेत.यासाठी शेतकरी वर्ग कामाला लागला आहे.

Web Title: Brief news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.