संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:13 IST2021-04-08T04:13:48+5:302021-04-08T04:13:48+5:30
अचलपूर : पोलीस कर्मचाऱ्यांचे फिटनेस चांगले राहावे, याकरिता अत्याधुनिक व्यायाम साधनांसह सुसज्ज पोलीस व्यायामशाळेचे उद्घाटन अचलपूर पोलीस ठाण्यात उपविभागीय ...

संक्षिप्त बातम्या
अचलपूर : पोलीस कर्मचाऱ्यांचे फिटनेस चांगले राहावे, याकरिता अत्याधुनिक व्यायाम साधनांसह सुसज्ज पोलीस व्यायामशाळेचे उद्घाटन अचलपूर पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी पोपटराव अब्दागिरे यांच्या हस्ते करण्यात आले. ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या व्यायामशाळेचा अचलपूर पोलीस ठाण्यात कार्यरत पुरुष व महिला कर्मचाऱ्यांना उपयोग होणार आहे.
------------
खांबोरा येथे मद्यपीकडून महिलेचा छळ
अचलपूर : सरमसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खांबोरा येथे २६ वर्षीय महिलेने मद्यपी पतीविरुद्ध छळाची तक्रार दाखल केली. सासरी येऊन तो वारंवार शिवीगाळ व मारहाण करीत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. पोलिसांनी भादंविचे कलम ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला.
--------
बोरगावपेठ येथे शेजाऱ्याला मारहाण
परतवाडा : अचलपूर ताक्क्यातील बोरगावपेठ येथे प्रमोद काशीराव रावळे (४०) याने क्षुल्लक कारणावरून ३० मार्च रोजी शेजारी राहणारे श्रवींद्र नागोराव हिरपूरकर (५०) यांना दगडाने मारहाण केली. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ६ एप्रिल रोजी सरमसपुरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
-----------
येरला शिवारातून मोटरपंप लंपास
नेरपिंगळाई : मोर्शी तालुक्यातील येरला येथील प्रशांत देशमुख (४१) यांच्या विहिरीवरील मोटरपंप व केबल लंपास करण्यात आला. ५ एप्रिल रोजी ही चोरी निदर्शनास आली. त्यांच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी
भादंविचे कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला.
--------------
टाकरखेडा शिवारात रेती पकडली
आसेगाव पूर्णा : नजीकच्या टाकरखेडा पूर्णा येथील पांढरीवरील दर्ग्याच्या कच्च्या रस्त्यावर आदित्य प्रकाश माहोरे (२४, रा. तामसवाडी) हा अवैध रेती घेऊन जात अशताना आढळून आला. सहायक पोलीस निरीक्षक यांच्या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करून मुद्देमाल जप्त केला.
-------------