थोडक्यात बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:25 IST2021-02-05T05:25:19+5:302021-02-05T05:25:19+5:30
अमरावती : शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या मालटेकडी परिसरात केरकचरा पडून आहे. याकडे कुणाचेही लक्ष नाही. परिणामी, आरोग्याच्या दृष्टीने घातक ...

थोडक्यात बातम्या
अमरावती : शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या मालटेकडी परिसरात केरकचरा पडून आहे. याकडे कुणाचेही लक्ष नाही. परिणामी, आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरत असलेल्या केरकचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मागणी होत आहे.
..........................
पल्स पोलिओसाठी आरोग्य विभाग सज्ज
अमरावती : पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवार ३१ जानेवारी रोजी जिल्ह्यात राबविली जाणार आहे. याकरिता जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.
......................................
महावितण कार्यालयासमोर रस्ता उखडला
अमरावती : स्थानिक महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोरून जाणारा डांबरी रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. त्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
.............................
शिक्षक समितीचे पालकमंत्र्यांना निवेदन
अमरावती : प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शिक्षकांच्या विविध न्याय्य मागण्या सोडविण्यासाठी नुकतेच निवेदन देण्यात आले. यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष गोकुल राऊत, राजेश सावरकर व पदाधिकारी उपस्थित होते.
...................
अविकसित उद्यानाचा विकास केव्हा
अमरावती : महापालिकेच्या क्षेत्रातील अविकसित असलेल्या उद्यानात सोईसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे ही उद्याने विकासापासून दूरच असल्याने याचा फायदा परिसरातील नागरिकांना होत नाही. त्यामुळे जनहितासाठी अविकसित उद्याने विकसित करण्याची मागणी होत आहे.
................................................
सावरपाणी रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत
चिखलदरा : तालुक्यांतर्गत येत असलेल्या सावरपाणी ते हिरापूर हा रस्ता मागील कित्येक वर्षापासून नादुरुस्त आहे. कच्च्या स्स्त्यावर ठिकठिकाणी खड्डे आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.