थोडक्यातील बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:24 IST2021-02-05T05:24:41+5:302021-02-05T05:24:41+5:30

अमरावती : जिल्हा परिषद बांधकाम विषय समितीची सभा बुधवारी झेड.पी.च्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडली. यावेळी अध्यक्ष बबलू ...

Brief news | थोडक्यातील बातम्या

थोडक्यातील बातम्या

अमरावती : जिल्हा परिषद बांधकाम विषय समितीची सभा बुधवारी झेड.पी.च्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडली. यावेळी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी बांधकाम विभागातील कामांचा विस्तृत आढावा घेऊन महत्त्वाच्या सूचना दिल्या.

.................

इर्वीनमध्ये दिव्यांग योजनेचे फलक लागले

अमरावती : केंद्र सरकारच्या नवीन कायद्याप्रमाणे अपंगांचे सातऐवजी २१ प्रकारचे दिव्यांग समाविष्ट केले आहे. परंतु याबाबत समाविष्ट असल्याबाबतचे माहितीफलक इर्वीन रुग्णालयात लावले नव्हते. या मागणीसाठी दिव्यांग बांधवांनी ठिय्या आंदोलन करताच अखेर माहितीचे फलक जिल्हा सामान्य रुग्णालयात झळकले आहेत.

...............................................

चपराशीपुरा परिसर वृक्षारोपण

अमरावती : स्थानिक चपराशीपुरा येथे महापालिकेच्या वतीने मोकळ्या जागेवर वृक्षारोपण करावे व जिम सुरू करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांकडे राजेंद्रसिंग बघेल यांनी केली आहे.

.....................................

अपंग जनता दलाचे धरणे

अमरावती : अपंग जनता दलाच्या वतीने बिजली योजनेचे कर्ज मंजूर करावे, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात शेख बब्बू शेख मोहम्मद, राजीश शाहा, मयूर मेश्राम व पदाधिकारी सहभागी झाले होते.

.............................

अन्न, औषध प्रशासन मंत्री शिंगणे आज जिल्ह्यात

अमरावती : राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे आज, गुरुवारी सकाळी १० वाजता येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल. सकाळी ११ वाजता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत विविध आढावा बैठकांना ते उपस्थित राहतील. त्यानंतर रात्री त्यांचा येथे मुक्काम राहणार आहे व उद्या, शुक्रवारी सकाळी आठ वाजता ते यवतमाळकडे प्रयाण करतील.

Web Title: Brief news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.