Brief news | थोडक्यात बातम्या

थोडक्यात बातम्या

अमरावती : येथील प्रादेशिक़ परिवहन अधिकारी राजाभाऊ गिते यांची कोल्हापूर येथे बदली करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्याच्या गृहविभागाने बुधवार, २० जानेवारी रोजी आदेश जारी केले आहेत. गिते यांच्या बदलीनंतर मात्र, अमरावतीचे आरटीओ म्हणून अद्याप कुणाचीही नियुक्ती झालेली नाही.

...........................

शनिवारी शिवसेनेची शहरात हिंदूत्व रॅली

अमरावती : हिंदूहदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना महानगरच्यावतीने शहरात शनिवार, २३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता राजकमल चौकातील नेहरू मैदान येथून मोटारसायकलने हिंदूत्व रॅली काढण्यात येणार आहे. त्याच्या पूर्वतयारीची बैठक महानगरप्रमुख पराग गुडधे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

.............................................

पाणीपुरवठा विभागासमोर बिल्डिंग़ मटेरीयलचा ढीग

अमरावती : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागासमोर काही दिवसांपासून बिल्डिंग मटेरीयलचा ढीग पडून आहे. मात्र, याची विल्हेवाट न लागल्याने पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

..............................

पंचायत समितीतील उद्यान भकास

अमरावती : स्थानिक भातकुली पंचायत समितीतील सभागृहासमाेरील उद्यानाकरिता प्रस्तावीत जागेचे सौद्यकीकरण अद्याप केलेले नाही. त्यामुळे हे उद्यान सध्याही भकास स्थितीत पडून आहे. त्यामुळे या उद्यानाचा कायापालट केव्हा होणार, हा खरा प्रश्न आहे.

........................

निवडणूक निकालाच्या गप्पा सुरूच

अमरावती : जिल्हाभरातील ५३७ ग्रामपंचायतींचा निकाल १८ जानेवारी रोजी जाहीर झाला. मात्र, या निकालातील विजयी व पराभूत उमेदवारांबाबत मताच्या विभाजनाच्या गप्पा अद्यापही रंगत आहेत.

Web Title: Brief news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.