थोडक्यातील बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:12 IST2021-01-15T04:12:07+5:302021-01-15T04:12:07+5:30
अंजनगाव सुर्जी : हे तालुक्याचे ठिकाण असून, ३ जिल्ह्याच्या मध्यभागी समान अंतरावर आहे. मात्र, असे असताना येथील एस बस ...

थोडक्यातील बातम्या
अंजनगाव सुर्जी : हे तालुक्याचे ठिकाण असून, ३ जिल्ह्याच्या मध्यभागी समान अंतरावर आहे. मात्र, असे असताना येथील एस बस आगाराचा प्रश्न कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे येथे तातडीने बस आगाराची निर्मिती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
..................
श्रीविहार कॉलनीत सांडपाणी साचले
अमरावती : कठोरा मार्गावरील शिवनेरी नगरातील श्री विहार कॉलनीत सांडपाण्याचे मोठे डबके साचले आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे नाल्या, रस्ते, पथदिव्यांचा या परिसरात अभाव आहे. त्यामुळे या मूलभृूत सोई सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
.............................................
जिल्हा परिषदेत शुकशुकाट
अमरावती : जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांची ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान प्रक्रियेसाठी नियुक्ती करण्यात आल्यामुळे गुरुवारी मिनीमंत्रालयातील विविध विभागांत शुकशुकाट असल्याचे चित्र दिसून आले.
.............................................................
गर्ल्स हायस्कुल ते बियाणी चौक रस्ता उखडला
अमरावती : शहरात वर्दळीचा मार्ग म्हणून ओळखला जाणाऱा गर्ल्स हायस्कुल ते बियाणी चौक हा डांबरी मार्ग काही महिन्यांपासून उखडला आहे. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
......................................................................
अमरावती ते निमखेड बाजार बसफेरी सुरू करा
अमरावती : स्थानिक मध्यवर्ती बसस्थानकाहून अमरावती ते निमखेड बाजार सुरू असलेले मुक्कामी बसफेरी काही वर्षांपासून बंद आहे. ही बसफेरी पुन्हा नव्याने सुरू करावी, अशी मागणी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हिरापूर, निमखेड बाजार, सावरपाणी, चौसाळा आदी गावांतील नागरिकांनी केली आहे.
.....................................