अमरावती : सायंकाळी ७ वाजता अमरावती बस स्थानकातून सुटणारी खल्लार मार्गे अंजनगाव सुर्जी एसटी बस नियमित सुरू करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. ही बस यापूर्वी नियमितपणे सुरू होती. मात्र, लॉकडाऊनपासून बंद आहे. ती पुन्हा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
.......।
‘पांदण रस्त्यांची कामे गतिमान करा’
अचलपूर : पावसाळ्यात पाणंद रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली. या रस्त्यांनी शेतातील माल आणणे कठीण झाले आहे. त्यामुळे पांदण रस्त्याची कामे गतिमान करण्याकडे शासनाने लक्ष देऊन समस्या निकाली काढावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
.........
जिल्हा परिषदेत सर्वसाधारण सभेची तयारी
अमरावती : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ही ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर होऊ घातली आहे. ही सभा १९ जानेवारी रोजी होणार आहे. या सभेकरिता जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेेने तयारी सुरू केली आहे.
.......................
गावोगावी निवडणुकीच्या रंगू लागल्या गप्पा
अमरावती: जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. त्यामुळे गावागावांतील चौकाचौकांत तसेच शेकोट्यांवर केवळ निवडणुकीच्याच गप्पा रंगताना दिसत आहेत.
.......................
निमखेड ते सावरपाणी रस्ता उखडला
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील निमखेड बाजार ते सावरपाणी हा रस्ता उखडला आहे. त्यामुळे या रस्त्याने ये-जा करणाऱ्या शेतकरी व नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.