थोडक्यातील बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:17 IST2020-12-30T04:17:32+5:302020-12-30T04:17:32+5:30

अमरावती: स्थानिक पंचवटी ते आरटीओ कार्यालयाकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर ठिकठिकाणी खडे पडले होते. परिणामी वाहनधारकांनाही मनस्ताप सहन करावा लागत ...

Brief news | थोडक्यातील बातम्या

थोडक्यातील बातम्या

अमरावती: स्थानिक पंचवटी ते आरटीओ कार्यालयाकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर ठिकठिकाणी खडे पडले होते. परिणामी वाहनधारकांनाही मनस्ताप सहन करावा लागत होता. वाहनधारकांची ही गैरसोय लक्षात घेता, या रस्त्याची मंगळवारी डागडुजी करण्यात आली. यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.

...............................................................

शिक्षक बँकेच्या कर्जाच्या व्याजदरात एक टक्क्याची कपात

अमरावती : दि अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या सभासदाकरिता नवीन वर्षापासून कर्जातील व्याजदरात एक टक्का कपात करण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाच्या २७ डिसेंबर रोजीच्या सभेत घेण्यात आला आहे. बँक़ेच्या संचालकांनी ही मागणी रेटून धरली होती. त्याची दखल घेत बँकेच्या सत्ताधारी गटाने हा निर्णय घेतला.

........................................................................................

जलव्यवस्थापन समितीच्या सभेची तयारी

अमरावती: जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी होत आहे. डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात दुपारी १ वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या अनुषंगाने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

...................................................................

गावोगावी निवडणुकीच्या गप्पा

अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने गावोगावी यावर आधारित गप्पांचा फड चौकाचौकांत रंगत आहे.

.......................................................................................

Web Title: Brief news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.