थोडक्यातील बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:10 IST2020-12-27T04:10:30+5:302020-12-27T04:10:30+5:30
अमरावती: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षित प्रभागातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. सुटीच्या जातपडताळणी अर्ज स्वीकृती सुरू ...

थोडक्यातील बातम्या
अमरावती: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षित प्रभागातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. सुटीच्या जातपडताळणी अर्ज स्वीकृती सुरू ठेवण्याची सूचना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी )केली आहे. त्यानुसार २७ डिसेंबरला शासकीय सुटीच्या दिवशी कार्यालय सुरू राहणार असल्याची माहिती समितीचे संशोधन अधिकारी दीपा हेरोडे यांनी दिली.
............
दहावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज सादर करावे
अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेत नियमित पुनर्परीक्षार्थी यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना २३ डिसेंबरपासून ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे.
...............
गणित प्रज्ञाशोध स्पर्धा जानेवारीत
अमरावती : थोर गणिती भास्कराचार्य दुसरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणारी यंदाची भास्कराचार्य गणित प्रज्ञाशोध परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते. २४ जानेवारीला सकाळी १० ते १२ या वेळेत ही स्पर्धा पार पडेल.१० जानेवारीपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. यासाठी दिलेल्या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन मुख्य संयोजक किरण बर्वे यांनी केले.
..............
स्मार्ट प्रकल्पांतर्गत अर्जाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत
अमरावती : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत समुदायाधारित संस्था संस्थात्मक खरेदीदार यांच्याकडून २४ जानेवारीला सकाळी १० ते १२ या वेळेत ही स्पर्धा होईल.१० जानेवारीपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. यासाठी दिलेल्या संकेतस्थळावर नोंदणी करावी. ऑनलाईन अर्ज मागे घेण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. शेतमाल शेळी व परसबागेतील कुक्कुटपालन यांच्या मूल्य साखळी विकासाकरिता भागीदार उपयोग प्रकल्प बाजार संपर्क वाढ उपक प्रकल्पासाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी अधिक माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामार्फत दिली जात आहे.