संक्षिप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:30 IST2021-02-05T05:30:46+5:302021-02-05T05:30:46+5:30

मोर्शी : तालुक्यातील खेड येथील एका व्यक्तीची ५० हजारांची कापून ठेवलेली तूर थ्रेशरने काढून नातलगानेच लंपास केल्याची तक्रार मोर्शी ...

Brief | संक्षिप्त

संक्षिप्त

मोर्शी : तालुक्यातील खेड येथील एका व्यक्तीची ५० हजारांची कापून ठेवलेली तूर थ्रेशरने काढून नातलगानेच लंपास केल्याची तक्रार मोर्शी पोलीस ठाण्यात देण्यात आली.

पोलीस सूत्रांनुसार, खेड येथील पुंडलिक महादेव राऊत (७४) यांची पत्नी व चार मजूर शेतात तूर काढण्यासाठी गेले होते. यावेळी नाना राऊत, चंदा राऊत, शैलेश राऊत व प्रल्हाद राऊत ही मंडळी आधीच शेतात होती. त्यामुळे मजूर घराकडे परतले. यानंतर

नाना राऊतसह चौघांनी थ्रेशर मशीन शेतात आणून तूर काढली व घरी नेली. याप्रकरणी ५० हजारांची तूर लंपास केल्याची तक्रार मोर्शी पोलिसांत पुंडलिक राऊत यांनी केली. पोलिसांनी भादंविचे कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. -------------

सालोड येथील युवकाची दुचाकी लंपास

नांदगाव खंडेश्वर : पंचायत समितीच्या आवारात दुचाकी ठेवून इमारतीत कामासाठी गेलेल्या एकनाथ रामचंद्र केवल (४०, रा. सालोड) या युवकाची दुचाकी लंपास करण्यात आली. १ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

---------------

धारणी येथे विवाहितेचा छळ

धारणी : तालुक्यातील राणीगाव येथे २४ वर्षीय विवाहितेचा छळ करण्यात आल्याची तक्रार देण्यात आली. याप्रकरणी धारणी पोलिसांनी तुकाराम जनार्दन केंद्रे, जनार्दन केंद्रे, महादेव जनार्दन केंद्रे व दोन महिला (सर्व रा. राणीगाव) यांच्यासह दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

------------

मोर्शी येथे युवकाला मारहाण

मोर्शी : सासूला त्रास का देतो, असे म्हणून इंदिरानगरातील चंद्रशेखर तुळशीराम पेठे (३७) या युवकावर चाकूचे वार करण्यात आले. त्यापूर्वी त्याला गजानन रामसे (रा. राजापेठ, अमरावती) व त्च्च्या सहकाऱ्याने दुचाकीवर बसवून अल्फा टॉकीजनजीक नेले व मारहाणदेखील केली. २८ जानेवारी रोजी ही घटना घडली. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी भादंविचे कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल केला.

Web Title: Brief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.