संक्षिप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:36 IST2021-01-08T04:36:57+5:302021-01-08T04:36:57+5:30

---------- तहसील कार्यालयाच्या आवारातून दुचाकी लंपास चांदूर बाजार : स्थानिक तहसील कार्यालयात निवडणुकीसंबंधी काम करण्यासाठी गेेलेले शेख रिजवाईल शेख ...

Brief | संक्षिप्त

संक्षिप्त

----------

तहसील कार्यालयाच्या आवारातून दुचाकी लंपास

चांदूर बाजार : स्थानिक तहसील कार्यालयात निवडणुकीसंबंधी काम करण्यासाठी गेेलेले शेख रिजवाईल शेख मजिद (३३, रा. करजगाव) यांची दुचाकी ४ जानेवारी रोजी आवारातून अज्ञात चोरट्याने लंपास केली. त्यांनी ५ जानेवारी रोजी चांदूर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

-----------

अचलपुरात इसमाला कत्त्याने मारहाण

अचलपूर : किला परिसरात घराचे दार बसविण्याच्या मुद्द्यावर मोहम्मद युसूफ शेख वजीर (४६) व त्यांच्या नातवाला कत्ता व दगडाने मारून जखमी करण्यात आले. त्यांच्या तक्रारीवरून अचलपूर पोलिसांनी शेख मोबीन शेख बिस्मिल्ला, भुरी शेख बिस्मिल्ला, शेख जमील शेख बिस्मिल्ला, शेख जुबेर शेख बिस्मिल्ला यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला.

-----------

सिंचनावरून शेंदूरजनाघाट येथे मारहाण

शेंदूरजनाघाट : सिंचनासाठी पाणी घेण्याच्या कारणावरून मुख्तार अहमद गुलाम रसूल (५२, रा. मलकापूर, शेंदूरजनाघाट) व त्यांच्या मुलाला जमील अहमद गुलाम रसूल, उमेर अहमद, उसामा अहमद यांनी पुसली शिवारात मारहाण केली. याप्रकरणी शेंदूरजनाघाट पोलिसांनी भादंविचे कलम ३२५, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.

----------

चौसाळा येथे युवकाला मारहाण

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील चौसाळा येथे गुणा दिलीप पाखरे (३०) याने वाहन पोलिसांनी जप्त करण्यामागे अतुल भीमराव पाखरे (२५) व गावातील बबलू गवई हे आहेत, असे म्हणत लाकडी ठोकळ्याने अतुलला मारहाण केली. अंजनगाव सुर्जी पोलिसांनी याप्रकरणी भादंविचे कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला.

--------------

बोराळा येथे युवकाला मारहाण

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील बोराळा येथे शुभम सुधाकर घोडस्कर (२६) याला मंगळवारी गावातीलच चौघांनी मारहाण केली. याप्रकरणी त्याच्या तक्रारीवरून अंजनगाव सुर्जी पोलिसांनी शरद देविदास वरखडे, स्वप्निल प्रकाश वरखडे, प्रफुल्ल प्रकाश वरखडे व एका महिलेविरुद्ध भादंविचे कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला.

------------

बँक खात्यातून रक्कम परस्पर लंपास

जरूड : वरूड येथील स्टेट बँकेतून मुरलीधर प्रयागराज कडू (४९, रा. साईबाबा कॉलनी) यांच्या खात्यातून १२ हजार ४०० रुपये परस्पर लंपास करण्यात आले. ३ ते ४ जानेवारी दरम्यान ही फसवणूक झाल्याची तक्रार त्यांनी वरूड पोलीस ठाण्यात नोंदविली. त्यावरून पोलिसांनी भादंविचे कलम ४२० तसेच ६६ माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अन्वये गुन्हा दाखल केला.

--------

शिरपूर बेडा येथे पत्नीची पत्नीला मारहाण

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील शिरपूर येथील बेड्यावर मद्यधुंद अवस्थेतील अरीमचंद सरास पवार (३५) याने पत्नी उषा (३०) हिला काठीने बदडले. ५ जानेवारी रोजी ही घटना घडली. नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी भादंविचे कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला.

-------------

कोव्हळा जटेश्वर येथे क्षुल्लक कारणावरून मारहाण

नांदगाव खंडेश्वर : लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोव्हळा जटेश्वर येथे विलास लवंगे यांच्याच्ट्यावर गप्पा करीत असलेल्या समूहातील बाळू बाबाराव लवंगे (५२) यांच्या अंगावर विनोद काशीनाथ लवंगे (४९) हा धावून गेला. त्याच्या मुलाने काठी व दगडाने मारले. याप्रकरणी लोणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याच प्रकरणात परस्परविरोधी तक्रारीवरून बाळू लवंगेविरुद्ध लोणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला. तुम्ही राजकारणात का पडता, असे म्हणत डोक्यावर पावडे मारल्याची तक्रार विनोद लवंगे यांनी दाखल केली. लोणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

-------------

मुलीला फूस लावून पळविले

दर्यापूर : शहरातील इंदिरानगर भागातून १७ वर्षीय नातीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार वृद्धेने सोमवारी नोंदविली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी मंगळवारी चेतन सावळे याच्याविरुद्ध भादंवितचे कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला.

Web Title: Brief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.