दोन ठिकाणी तोडला सहाव्यांदा पूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 06:00 IST2019-09-14T06:00:00+5:302019-09-14T06:00:57+5:30
रात्री १ वाजता मोठ्या प्रमाणात पाणी शिरू लागल्याने सरपंच व सदस्यांनी वॉर्ड २ मधील सर्व नागरिकांना झोपेतून जागे केले. त्यानंतर तात्काळ रस्ता चौपदरीकरण करणाऱ्या एमएसकेएल कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिली. त्यांनी सदर पूल सोडण्यास नकार दिला. मात्र, पाण्याचा वाढता प्रवाह आणि नागरिकांच्या दबावामुळे रात्री दीड वाजता पूल तोडण्यात आला.

दोन ठिकाणी तोडला सहाव्यांदा पूल
परतवाडा : सपन प्रकल्पाचे दरवाजे २० सेंटिमीटरने उघडल्याने नदीचा प्रवाह वाढून गुरुवारी रात्री १ वाजताच्या सुमारास सावळी दातुरा येथील वॉर्ड २ मधील ८५ घरांमध्ये पाणी शिरले. पाण्याचा वेगवान प्रवाह पाहता, सरपंच व सदस्यांनी नागरिकांना झोपेतून उठविले. परतवाडा-अकोला महामार्गावर तात्पुरता बांधलेला पूल सहाव्यांदा दोन ठिकाणी तोडल्यानंतर प्रवाह काहीसा शांत झाला.
चिखलदरा व परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर गुरुवारी रात्री ११:३० च्या सुमारास सावळी दातुरा परिसरात सपन नदीला पाण्याचा प्रवाह वाढत होता. सरपंच मनोहर बहुराशी, सदस्य राजेश पावडे, सामाजिक कार्यकर्ते प्यारेलाल प्रजापती यांनी विचारणा केली असता, सपन प्रकल्प अधिकारी व प्रशासनाने विसंगत माहिती दिली. रात्री १ वाजता मोठ्या प्रमाणात पाणी शिरू लागल्याने सरपंच व सदस्यांनी वॉर्ड २ मधील सर्व नागरिकांना झोपेतून जागे केले. त्यानंतर तात्काळ रस्ता चौपदरीकरण करणाऱ्या एमएसकेएल कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिली. त्यांनी सदर पूल सोडण्यास नकार दिला. मात्र, पाण्याचा वाढता प्रवाह आणि नागरिकांच्या दबावामुळे रात्री दीड वाजता पूल तोडण्यात आला. नदीकाठच्या घरांमध्ये धान्य आणि कपड्यांचे नुकसान झाले.
गुरुवारी रात्री पाण्याचा विसर्ग सर्वाधिक होता. त्याची माहिती प्रशासनाने दिली नाही. संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीला दोन ठिकाणी पूल तोडण्यास लावले. त्यामुळे अनर्थ टळला.
- मनोहर बहुराशी, सरपंच