महामारीतही पाच जिल्ह्यांत लाचखोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:10 IST2021-06-01T04:10:47+5:302021-06-01T04:10:47+5:30

अमरावती/ संदीप मानकर गतवर्षीच्या तुलनेत कोरोनाकाळात २०२० मध्ये एसीबी ट्रॅपमध्ये घटले आहेत. वर्षभरात अमरावती, अकोला, यवतमाळ , बुलडाणा, ...

Bribery in five districts even during the epidemic | महामारीतही पाच जिल्ह्यांत लाचखोरी

महामारीतही पाच जिल्ह्यांत लाचखोरी

अमरावती/ संदीप मानकर

गतवर्षीच्या तुलनेत कोरोनाकाळात २०२० मध्ये एसीबी ट्रॅपमध्ये घटले आहेत. वर्षभरात अमरावती, अकोला, यवतमाळ , बुलडाणा, वाशिम या पाच जिल्ह्यांमध्ये ८५ सापळे यशस्वी झाले. त्यामध्ये एकूण १२० आरोपी अडकले. महामारीतही पाच जिल्ह्यांमध्ये लाचखोरीत पोलीस विभाग अव्वल आहे. या विभागातील २४ जणांविरुद्ध ट्रॅप यशस्वी झाले. १७ ट्रॅपसह दुसऱ्या क्रमांकावर महसूल विभाग आहे.

पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये २०१९ या वर्षात १०३ सापळे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी यशस्वी केले होते. त्यामध्ये १४० आरोपींना तपास पथकाने ताब्यात घेतले. गत पाच महिन्यांत सतत लॉकडाऊन असल्याने एसीबी ट्रॅपमध्ये घट झाली असली तरी लाचखोरी थांबलेली नाही. पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पथकाने या कारवाया केल्या आहेत.

कोणत्या वर्षात किती कारवाया ?

२०१८-९७

२०१९-१०३

२०२०-८५

कोरोनाकाळात पोलिसांची वरकमाई जोरात

वनविभाग - ५

महसूल - १७

पोलीस - २४

महवितरण - ३

नगरविकास - १

ग्रामविकास - १

अन्न व नागरी - ०

बांधकाम विभाग - ०

पंचायत समिती - ८

बॉक्स:

अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक कारवाया

गतवर्षी विभागात अमरावती जिल्ह्यात एसीबीच्या सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या. जिल्ह्यात २५ ट्रॅप झाले, तर अकोला व यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येकी १६ सापळे यशस्वी झाले. बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात प्रत्येकी १४ ट्रॅप यशस्वी झाले. लाचखोरीमध्ये ७३ खासगी कर्मचारी, तर सात इतर लोकसेवक तर २० खासगी व्यक्तींचा समावेश आहे.

कोट आहे.

Web Title: Bribery in five districts even during the epidemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.