दमयंतीला हवा मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:13 IST2021-05-27T04:13:56+5:302021-05-27T04:13:56+5:30
गाळ, अनावश्यक वनस्पती काढण्याची मागणी मोर्शी : शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या दमयंती नदीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ व अनावश्यक वनस्पती वाढल्याने ...

दमयंतीला हवा मोकळा श्वास
गाळ, अनावश्यक वनस्पती काढण्याची मागणी
मोर्शी : शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या दमयंती नदीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ व अनावश्यक वनस्पती वाढल्याने नदी उथळ झाली आहे. पर्यायाने पावसाळ्यात नदीला पूर येऊन नागरिकांच्या घरात पाणी जाते व आर्थिक नुकसान होते. ही नदी स्वच्छ करण्याची मागणी होत आहे.
शहराच्या मध्यवस्तीतून वाहणाऱ्या दमयंती नदीचा पिच्छा जलपर्णी वनस्पतींनी अजूनही सोडला नसून, पावसाळा तोंडावर आल्यावरसुद्धा नदी स्वछ झालेली नाही.
परिणामी पावसाळ्यात नदीला पूर आल्यास पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात घुसून वित्तीय हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोर्शी शहराच्या मध्यवस्तीतून दमयंती नदी वाहते. या नदीच्या काठावरच शहरातील काही भागात घरे असल्याने व पावसाळ्यात पूर आल्यास या नदीचे पाणी घरात घुसून वित्तीय हानी होण्याचे प्रकार दरवर्षी घडते.
दरम्यान, येत्या काही दिवसांत दमयंती नदीतील अनावश्यक वनस्पती काढून स्वच्छ करण्यात येणार असल्याचे मत मोर्शी नगर परिषदेचे शिक्षण सभापती डॉ. प्रदीप कुऱ्हाडे यांनी सांगितले.
नदीत वाढणाऱ्या वनस्पतीची पाहणी करण्यात आलेली असून, नदी स्वच्छ करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. पावसाळ्यापूर्वी ही नदी स्वच्छ होईल, असा विश्वास नगराध्यक्ष मेघना मडघे यांनी व्यक्त केला.