‘पारश्री’मध्ये तोडफोड
By Admin | Updated: November 3, 2014 23:17 IST2014-11-03T23:17:51+5:302014-11-03T23:17:51+5:30
पारश्री हॉस्पिटलमधून सुटी दिलेल्या महिला रुग्णाचा अनपेक्षित मृत्यू झाल्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी हॉस्पिटलची प्रचंड तोडफोड केली.

‘पारश्री’मध्ये तोडफोड
नातेवाईकांचा संताप अनावर : सुटी दिल्यानंतर मृत्यू कसा ?
अमरावती : पारश्री हॉस्पिटलमधून सुटी दिलेल्या महिला रुग्णाचा अनपेक्षित मृत्यू झाल्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी हॉस्पिटलची प्रचंड तोडफोड केली.
सोमवारी सायंकाळी ८.३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर खापर्डे बगिचा परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा पोलीस ताफा तैनात करण्यात आला. स्थिती नियंत्रणात यावी म्हणून नेतेही घटनास्थळी दाखल झालेत.
जमील कॉलनी परिसरातील रहिवासी मुनिफा बी मोहमद हनिफ (६०) यांना १६ आॅक्टोबर रोजी पारश्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून सोमवारी सायंकाळी ४.३० पर्यंत त्यांच्यावर ‘पारश्री’मध्येच उपचार सुरू होते. ४.३० वाजता त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. घरी नेताच त्यांची प्रकृती ढासळली. रुग्ण बरा झाल्याच्या खुशीत असलेल्या नातेवाईकांनी पुन्हा रुग्णालय गाठले. डॉ. मोहीन खान यांनी तपासणीअंती मुनिफा बी यांना मृत घोषित केले. नातेवाईकांचा संताप अनावर झाला.