राज्यातील कारागृहांत कैद्यांच्या भेटीला ‘ब्रेक’; दोन आठवडे तात्पुरत्या कारागृहात बंदीजनांचा मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 06:39 PM2020-10-11T18:39:40+5:302020-10-11T18:40:06+5:30

कोरोना इफेक्ट

A ‘break’ to visit inmates in state prisons; Inmates stay in temporary jail for two weeks | राज्यातील कारागृहांत कैद्यांच्या भेटीला ‘ब्रेक’; दोन आठवडे तात्पुरत्या कारागृहात बंदीजनांचा मुक्काम

राज्यातील कारागृहांत कैद्यांच्या भेटीला ‘ब्रेक’; दोन आठवडे तात्पुरत्या कारागृहात बंदीजनांचा मुक्काम

Next

- गणेश वासनिक

अमरावती : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कारागृहांत कैद्यांच्या नातेवाईकांसोबतच्या भेटीला तूर्त मनाई आहे. आठवड्यातून एक दिवस व्हिडीओ कॉलींगद्वारे कैद्यांना आप्त स्वकीयांसोबत संवाद साधण्याची हल्ली सुविधा आहे. अगोदर कैद्यांना कारागृहात इंटरकॉम प्रणालीद्वारे नातेवाईकांसोबत आमने-सामने संवाद साधता येत होता. परंतु, कोरोनामुळे राज्यभरातील कैद्यांना नातेवाईकांसोबतच्या भेटीला लगाम लावण्यात आला आहे.

मुंबई येथील ऑर्थर रोड, पुणे येथील येरवडा, नागपूर व अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात कर्मचारी व बंदीजन हे कोरोना संक्र मित आढळून आल्याने सुरक्षा यंत्रणा हादरून गेली होती. गृह विभागाच्या आदेशानुसार मे महिन्यापासूनच कारागृहात कैद्यांची नातेवाईकांसोबतच्या भेटीला ‘ब्रेक’ लावण्यात आला. नागपूर येथे जुलै, तर अमरावती मध्यवर्ती कारागृहात ऑगस्ट महिन्यात पहिल्यांदा कैदी संक्रमित आढळून आले.

गृह विभागाच्या नव्या गाईडलाईननुसार नवीन कैद्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात कारागृह साकारण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार कारागृहात पाठविल्या जाणाऱ्या कैद्यांना अगोदर दोन आठवडे तेथे मुक्काम अनिवार्य आहे. कोरोना चाचणी, अहवाल, डॉक्टरांकडून तपासणी आदी पूतर्तेनंतरच बंदीजनांना जुने कारागृहात ठेवण्यात येते. राज्यात ९ मध्यवर्ती कारागृह, ११ खुले कारागृह, ४७ जिल्हा कारागृह वर्ग १ व २ आणि दोन महिला कारागृहांत कैद्यांच्या नातेवाईकांसोबतच्या भेटीला मनाई आहे.

व्हिडीओ कॉलींगची सुविधा

कोरोनामुळे तूर्तास कैद्यांची नातेवाईकांसोबतची भेट, संवाद बंद आहे. तथापि, कैद्यांच्या मागणीनुसार आठवड्यातून एकदा व्हिडीओ कॉलींगद्वारे नातेवाईकांसोबत संवाद साधता येणार आहे. तशी सुविधा कारागृह प्रशासनाने केली आहे. त्याकरिता निरीक्षक नेमण्यात आले असून, कैद्यांना सोयीनुसार त्यांच्या नातेवाईकांसोबत व्हिडीओ कॉलींगद्वारे संवाद साधता येत आहे. ही सुविधा तात्पुरत्या व जुने कारागृहात उपलब्ध आहे.

कैद्यांची दोनदा कोरोना चाचणी

न्यायालयाच्या आदेशान्वये कारागृहात येणाºया कैद्यांची दोनदा कोरोना चाचणी करण्यात येत आहे. तात्पुरत्या कारागृहात कैद्यांची कोरोना चाचणी होते. येथे दोन आठवडे मुक्कामानंतर पुन्हा अँटिजेन चाचणी केली जाते. अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर जुने कारागृहात सदर कैदी पाठविले जातात, अशी माहिती आरोग्य यंत्रणेकडून मिळाली आहे. 

बंदीजनांच्या नातेवाईकांसोबतच्या इंटरकॉम भेटीला राज्यभरातील कारागृहांमध्ये मनाई आहे. तसे गृहविभागाचे आदेश आहेत. मात्र, रोटेशन प्रणालीनुसार कैद्यांना आठवड्यातून एकदा व्हिडीओ कॉलिंगद्वारे नातेवाईकांसोबत संवाद साधता येत आहे.
- रमेश कांबळे, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह अमरावती.

Web Title: A ‘break’ to visit inmates in state prisons; Inmates stay in temporary jail for two weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jailतुरुंग