मनपाच्या योजना वस्तीत पोहोचविण्यावर मंथन
By Admin | Updated: July 8, 2015 00:27 IST2015-07-08T00:27:32+5:302015-07-08T00:27:32+5:30
राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत दारिद्र्यरेषेखालील महिला बचत गटातील सदस्यांच्या उपस्थितीत महापौर, आयुक्तांची कार्यशाळा सोमवारी पार पडली..

मनपाच्या योजना वस्तीत पोहोचविण्यावर मंथन
आयुक्तांचे प्रतिपादन : बचत गटातील महिलांकरिता खुले संवादपत्र, कार्यशाळा
अमरावती : राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत दारिद्र्यरेषेखालील महिला बचत गटातील सदस्यांच्या उपस्थितीत महापौर, आयुक्तांची कार्यशाळा सोमवारी पार पडली.शासकीय योजना थेट वस्तीमध्ये पोहोचविण्याकरिता व वस्तीतील अडचणी मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी यावेळी जाणून त्यावर उपाय सुचविले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय आहे किंवा नाही हे फॉर्म भरून घेण्यात आले. तसेच बँककर्ज मंजुरीबाबत अडचणी जाणून घेण्यात आल्या. योजना बरोबर पोहोचते की नाही याबाबत प्रत्यक्ष चर्चा करून माहिती जाणून घेतली.
सर्व महाकौशल्य योजना, कौशल्यावर ट्रेनिंगबाबत योजनेच्या माहिती स्वयंरोजगार अधिकारी अशोक पाईकराव यांनी दिली. अर्ज भरण्याविषयी यावेळी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेला महापौर चरणजितकौर नंदा, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, स्थायी समिती सभापती विलास इंगोले, विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर, गटनेता अविनाश मार्डीकर, गुंफाबाई मेश्राम, शिक्षण समिती सभापती अब्दुल रफीक अब्दुल रज्जाक, झोन सभापती मिलिंद बांबल, ममता आवारे, शहर सुधार समिती सभापती भूषण बनसोड, महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता वाघ, शिक्षण उपसभापती इमरान अशरफी, महिला व बालकल्याण समिती उपसभापती जयश्री मोरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संचालिका वंदना गुल्हाने यांनी केले.
समूह संघटिका प्रतिभा वानखडे, सुषमा किनगावकर, उज्ज्वला मेश्राम तसेच कांचन राऊत, आशा बोबडे, अजय चव्हाण व सर्व वस्ती स्वयंसेविका, सर्व बचत गटातील सदस्यांनी अथक परिश्रम घेऊन मोठ्या संख्येने महिलांना योजना थेट पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)