दर्यापूर बाजार समितीच्या सभापतिपदी बरवट, उपसभापतिपदी ब्राह्मणकर

By Admin | Updated: September 19, 2015 00:07 IST2015-09-19T00:07:32+5:302015-09-19T00:07:32+5:30

शुक्रवारी दर्यापूर बाजार समितीच्या टीएमसी सभागृहात पार पडलेल्या सभापती, उपसभापतीपदाच्या निवडणफकीत ईश्वर चिठ्ठीने ..

Brahminkar as the chairperson of the Daryapur Market Committee; | दर्यापूर बाजार समितीच्या सभापतिपदी बरवट, उपसभापतिपदी ब्राह्मणकर

दर्यापूर बाजार समितीच्या सभापतिपदी बरवट, उपसभापतिपदी ब्राह्मणकर

शेतकरी पॅनलने मारली बाजी : सुधाकर भारसाकळे, बळवंत वानखडे यांचा पराभव
संदीप मानकर दर्यापूर
शुक्रवारी दर्यापूर बाजार समितीच्या टीएमसी सभागृहात पार पडलेल्या सभापती, उपसभापतीपदाच्या निवडणफकीत ईश्वर चिठ्ठीने शेतकरी पॅनेलचे संचालक बाबाराव पाटील बरवट यांचा सभापती पदी तर पाच पॅनेलचे नरेंद्र ब्राम्हणकर यांचा उपसभापती पदी ईश्वर चिठ्ठीने ऐतिहासीक विजय झाला. प्रतिस्पर्धी सहकार पॅनेलचे संचालक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे व बळवंत वानखडे यांचा पराभव झाला आहे.
आमदार प्रकाश पाटील भारसाकळे, आमदार रमेश बुंदिले, बाबाराव पाटील बरवट, कुलदिप पाटील गावंडे, गंगाधर देवके, सुनील डिके यांच्या नेतृत्वात शेतकरी पॅनेलने ९ जागा पटकावल्या तर प्रतिस्पर्धी सहकार पॅनेलला ५ तर किसान पॅनेलला ४ जागा मिळाल्यात.

Web Title: Brahminkar as the chairperson of the Daryapur Market Committee;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.