शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मणवाडा थडी मंडळाला अतिवृष्टीच्या मदतीतून वगळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 14:13 IST

प्रशासनाच्या चुकीचा सात हजार शेतकऱ्यांना फटका : महसूल प्रशासनाने फक्त दोनच मंडळांसाठी केली निधीची मागणी, शेतकऱ्यांमध्ये नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : तालुक्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना २३ सप्टेंबर २०२४ शासन निर्णयानुसार आर्थिक मदत मिळणे क्रमप्राप्त होते. त्यासाठी स्थानिक महसूल प्रशासनाकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पीकनिहाय नुकसानभरपाईच्या निधीची मागणी करणे गरजेचे होते. मात्र, तालुक्यातील तीन महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली असताना दोनच महसूल मंडळांसाठी निधीची मागणी महसूल व कृषी विभागाने केली. ब्राह्मणवाडा थडी महसूल मंडळाला वगळल्याने त्याचा फटका अंदाजे ७ हजार ४०० शेतकऱ्यांना बसला आहे.

तालुक्यातील सात मंडळांपैकी जुलै व ऑगस्ट महिन्यांत करजगाव, तळेगाव मोहना व ब्राह्मणवाडा थडी या तीन महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली होती. यापैकी करजगाव व तळेगाव मोहना या दोन मंडळांतील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी पीक नुकसानासाठी मदत निधीची मागणी महसूल व कृषी विभागाने केली आहे. करजगाव मंडळातील २७९८ शेतकऱ्यांच्या, २१४७ हेक्टरच्या पीक नुकसानासाठी २ कोटी ९१ लाख ८५ लाख ८७२ रुपये, तर तळेगाव मोहना मंडळातील ५२७६ शेतकऱ्यांच्या ४७१५.९२ हेक्टरसाठी ६ कोटी ४१ लाख ३६ हजार ५१२ रुपये निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. 

प्रशासनाला ब्राम्हणवाडा शेतकऱ्यांचा विसरब्राह्मणवाडा थडी मंडळात तीन वेळच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पीकनिहाय झालेले नुकसान याचे पाहणी सर्वेक्षण करण्याचेही सौजन्य महसूल व कृषी विभागाने दाखविले नाही. तालुक्यातील दोन मंडळांतील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीचा निधी मागणारे प्रशासन ब्राह्मणवाडा थडी मंडळातील शेतकऱ्यांना मात्र सपशेल विसरले. ७४०० ब्राह्मणवाडा थडी महसूल मंडळाला अतिवृष्टीच्या मदतीपासून वगळल्याने त्याचा फटका मंडळातील अंदाजे ७ हजार ४०० शेतकऱ्यांना बसला आहे.

"तांत्रिक अडचणींमुळे ही चूक झाली असावी. ब्राह्मणवाडा थडी मंडळातील अतिवृष्टीच्या पीक नुकसानीची माहिती घेण्यात येईल. विशेष बाबअंतर्गत निधीची मागणी करून मदत देण्यात येईल."- रामदास शेळके, तहसीलदार, चांदूर बा.

"ब्राह्मणवाडा थडी मंडळात नुकसानाचे सर्वेक्षणच झाले नाही. स्थानिक महसूल व कृषी प्रशासनाच्या अक्षम्य चुकीबद्दल लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला जाब विचारून शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळवून द्यावी."- वामन ईसळ शेतकरी, गणोजा

"अतिवृष्टी मदतीची मागणी करून मदत देण्यात आली नाही. तीनही मंडळातील शेतकऱ्यांना, अतिवृष्टीची मदत देण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल."- गोपाल भालेराव, अध्यक्ष, लोक विकास संघटना

टॅग्स :AmravatiअमरावतीRainपाऊस