दहावी, बारावी परीक्षांच्या कामकाजावर शिक्षक संघटनांचा बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:13 IST2021-03-15T04:13:21+5:302021-03-15T04:13:21+5:30
अमरावती : राज्य शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षा २९ एप्रिलपासून सुरू होईल, असे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र, विनाअनुदानित, ...

दहावी, बारावी परीक्षांच्या कामकाजावर शिक्षक संघटनांचा बहिष्कार
अमरावती : राज्य शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षा २९ एप्रिलपासून सुरू होईल, असे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकच्या शिक्षकांच्या वेतन अनुदानाचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे दहावी, बारावी परीक्षांच्या कामकाजावर शिक्षक संघटनांनी बहिष्कार टाकला. यात राज्य शिक्षक संघ सहभागी असल्याचे अध्यक्ष दिलीप कडू यांनी स्पष्ट केले.
शिक्षक समन्वयक संघाच्यावतीने दहावी, बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकला असून, २९ जानेवारीपासून मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. परंतु, शासनाकडून याविषयी ठोस निर्णय झाला नाही. १३ सप्टेंबर २०१९ रोजी २० टक्के अनुदानासाठी पात्र शाळा तसेच २० टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना ४० टक्के अनुदानाचा टप्पा तात्काळ मंजूर करावा आणि क्षुल्लक त्रुटी दाखवत अपात्र केलेल्या शाळा व तुकड्यांना अनुदान मंजूर करावे, अशी मागणी आहे. मुंबई, कोल्हापूर विभागातील २४ फेब्रुवारीला घोषित केलेल्या शाळांची त्रुटी पूर्तता हाेताच सोबत अनुदान वितरणाचे आदेश काढावे, अशी मागणी राज्य शिक्षक संघातर्फे करण्यात आली. शिक्षकांची मागणी पूर्ण न झाल्यास दहावी, बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार कायम राहील, असा इशारा राज्य शिक्षक संघाने दिला आहे.