चांदूरबाजार फाट्यावरून दारूच्या पेट्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:11 IST2021-01-15T04:11:56+5:302021-01-15T04:11:56+5:30
´पान ३ साठी २.७६ लाखांचा मुद्देमाल जप्त : आसेगाव पोलिसांची कारवाई आसेगाव पूर्णा : गावालगतच्या चांदूरबाजार फाट्याहून देशी दारूच्या ...

चांदूरबाजार फाट्यावरून दारूच्या पेट्या जप्त
´पान ३ साठी
२.७६ लाखांचा मुद्देमाल जप्त : आसेगाव पोलिसांची कारवाई
आसेगाव पूर्णा : गावालगतच्या चांदूरबाजार फाट्याहून देशी दारूच्या २८ पेट्या जप्त करण्यात आल्या. याशिवाय एक चारचाकी वाहन व मोबाईल असा एकूण २ लाख ७६ हजार ८८८ रुपयांचा माल पोलिसांनी ताब्यात घेतला. आसेगाव पोलिसांनी गुरुवारी ही कारवाई केली.
स्थानिक बसस्थानक परिसरात नाकाबंदी सुरू असताना पोलिसांना अमरावतीहून परतवाड्याकडे जाणारी कार दिसली. मात्र, पुढे पोलीस असल्याचे पाहून चालकाने कार वळविली. त्यामुळे पोलिसांनी कारचा पाठलाग केला. चांदूरबाजार फाट्याजवळ हे वाहन थांबविण्यात आले. झडतीदरम्यान, त्यात २८ पेट्या देशी दारू आढळून आली. आरोपी अब्दुल जमीर अब्दुल जलील (३७,रा. तळणी, ता मोर्शी) याला अटक करण्यात आली आहे.
आसेगाव पूर्णाचे ठाणेदार किशोर तावडे, सहायक पोलीस निरीक्षक समाधान वाठोरे यांच्यासह नंदकिशोर बाकल, सागर डोंगरे यांनी ही कार्यवाही केली. उपविभागीय पोलीस अधिकारी पूनम पाटील यांच्या मार्गदर्शनात नाकाबंदी करण्यात आली. एम एच ३१ बीव्ही १५३६ असा जप्त वाहनाचा क्रमांक आहे.
----------