शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

जिल्ह्यातील २७७ गावांनी रोखल्या कोरोनाच्या दोन्ही लाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:13 IST

अमरावती : कोरोनापासून बचावासाठीच्या त्रिसूत्रीचे पालन करीत जिल्ह्यातील २७७ गावांनी कोरोनाची पहिली व दुसरी लाट थोपविण्याची किमया साधली आहे. ...

अमरावती : कोरोनापासून बचावासाठीच्या त्रिसूत्रीचे पालन करीत जिल्ह्यातील २७७ गावांनी कोरोनाची पहिली व दुसरी लाट थोपविण्याची किमया साधली आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले असताना या दोन्ही लाटांदरम्यान आपल्या गावाची वेस सुरक्षित ठेवण्यात या गावांनी यश मिळविले आहे. त्यामुळे या गावांच्या यशाचे नेमके गमक शोधून त्याचा पॅटर्न विकसित करण्याची आवश्यकता आहे.

जवळपास दीड वर्षाच्या अविरत परिश्रमानंतर दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झालेली दिसत आहे. प्रशासकीय यंत्रणा काहीशी थकलेली असली तरी तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी पुन्हा जोरकस प्रयत्न करीत आहे. पहिल्या लाटेचा ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात कोरोनाचा संसर्ग वाढीस लागला होता. दुसऱ्या लाटेत शहरात कोरोना संसर्ग कमी असली तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात मात्र संसर्ग चांगलाच वाढला आहे. कोरोना संसर्गाची वाढती व्याप्ती लक्षात घेता बाधितांच्या जवळून संपर्कातील व्यक्तीचे कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग करण्यात व्यस्त असलेल्या प्रशासकीय यंत्रणेने मोठ्या प्रमाणात नागरिकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला. या गावांनी जाणीवपूर्वक किंवा आपसुकच आचरणात आणलेली जीवनपद्धती व आपल्या दैनंदिन व्यवहारावर घातलेल्या मर्यादांचा महसूल, आरोग्य आणि ग्रामीण विकास विभागातील अधिकाऱ्यांनी अभ्यास केल्यास त्याचा तिसऱ्या लाटेचा मुकाबला करताना उपयोग होऊ शकतो. या गावांनी प्रशासनाच्या त्रिसूत्रीचे प्रामाणिकपणे पालन केल्यामुळे ही गावे आजघडीला कोरोनाच्या संसर्गापासून दूर असल्याचे जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

बॉक्स

अनेक तालुक्यांतील गावांचे योगदान

जिल्ह्यात प्रामुख्याने दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेळघाटातील धारणी, चिखलदरा या तालुक्यासह इतरही १२ तालुक्यांमध्ये अनेक गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले. कोरोनाला दोन्ही लाटांमध्ये थोपविणाऱ्या २७७ गावांपैकी अनेक गावे ही आदिवासी व गैरआदिवासी भाग असलेल्या तालुक्यातील आहेत.

बॉक्स

पॅटर्नचा अभ्यास करा

या २७७ गावांचे सर्वेक्षण करून त्याचा पॅटर्न निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने लोकप्रतिनिधींसह, जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या यंत्रणांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी आता होऊ लागली आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून उपाय योजना करण्यास मदत होऊ शकते.

बॉक्स

असे रोखले कोरोनाला

या गावातील बहुतांश नागरिकांनी संक्रमित शहरी तसेच ग्रामीण भागातील काही मोठ्या गावांपासून स्वतःला दूर ठेवले. यातील बहुतेक गावे दुर्गम व गैरआदिवासी भागातील असल्याने गावकऱ्यांनी शहरी भागात जाणे. जाणीवपूर्वक टाळले. कोणी बाहेरून गावात आल्यास त्यांना दूर ठेवून विलगीकरणात ठेवण्यात आले. विशेष म्हणजे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी प्रभावी जनजागृती, शासन व प्रशासनाने जारी केलेल्या त्रिसूत्रीचे पालन व ग्राम दक्षता समिती, ग्रामपंचायतींनी केलेल्या उपाययोजनांमुळे आजघडीला कोरोना रोखण्यात यश आले आहे.

बॉक्स

तालुकानिहाय कोरोना मुक्त गावे

अमरावती ७, भातकुली १४, दर्यापूर ६, अंजनगाव सुर्जी २२, धारणी१३, चिखलदरा १५, चांदूर बाजार२७, वरूड ४७, मोर्शी ३५, तिवसा ४, नांदगाव खंडेश्वर१७, चांदूर रेल्वे २४, धामणगाव रेल्वे १३

कोट

कोरोनाच्या संसर्गापासून ग्रामीण भागातील २७७ गावे दूर आहेत. त्यातील काही गावे आदिवासी व गैरआदिवासी भागातील आतापर्यंत कोरोनाला रोखण्यात या गावांना यश आले. ही समाधानाची बाब आहे. यातील काही निवड गावांनी उपाययोजनांबाबत केलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करून त्यानुसार इतरही गावात उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

- अविश्यांत पंडा,

मुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा परिषद