शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
3
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
4
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
5
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
6
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
7
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
8
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
9
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
10
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
11
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
12
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
13
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
14
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
15
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
16
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
17
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
18
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
19
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
20
५० रुपये प्रति तास या हिशोबाने भाड्याने मिळतायेत 'Friend'; केरळमधील अजब ट्रेंडनं वाढवलं टेन्शन

परतवाड्याहून पर्यटनगरीकडे जाणारे दोन्ही मार्ग उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 05:01 IST

परतवाडा शहरातून धामणगाव गढी आणि घटांग मार्गाने असे दोन प्रमुख रस्ते चिखलदरा पर्यटननगरीकडे वळतात. यात धामणगाव गढी मार्गाची स्थिती वाईट आहे. मनभंगपासून मडकीपर्यंत तर काही भागात रस्ताच शिल्लक राहिलेला नाही. परतवाडा-धारणी मार्गावर घटांगपासून वळणाऱ्या रस्त्याची स्थिती तर शब्दापलीकडची ठरली आहे. शेतातील वहिवाटीच्या रस्त्यावर ट्रॅक्टरमुळे पडणाऱ्या खोलगट चवऱ्यांप्रमाणे धोकादायक चवरे या डांबरी रस्त्यावर पडले आहेत. खड्ड्यांच्या परिभाषेच्या बाहेरील ते आहेत.

ठळक मुद्देब्रिटिशकालीन रस्ते, अनेक ठिकाणी खोल खड़्डे, वाहनचालकांना करावी लागते कसरत

  लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : पर्यटननगरी चिखलदराकडे परतवाडा शहरातून जाणारे दोन्ही प्रमुख ब्रिटिशकालीन मार्ग उद्ध्वस्त झाले आहेत. या मार्गावर अनेक ठिकाणी रस्ताच शिल्लक राहिलेला नाही. रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे या दोन्ही मार्गांची चाळणी झाली आहे. पर्यटकांसह वाहनचालक व स्थानिक रहिवाशांच्या जिवावर हे मार्ग उठले आहेत. परतवाडा शहरातून धामणगाव गढी आणि घटांग मार्गाने असे दोन प्रमुख रस्ते चिखलदरा पर्यटननगरीकडे वळतात. यात धामणगाव गढी मार्गाची स्थिती वाईट आहे. मनभंगपासून मडकीपर्यंत तर काही भागात रस्ताच शिल्लक राहिलेला नाही. परतवाडा-धारणी मार्गावर घटांगपासून वळणाऱ्या रस्त्याची स्थिती तर शब्दापलीकडची ठरली आहे. शेतातील वहिवाटीच्या रस्त्यावर ट्रॅक्टरमुळे पडणाऱ्या खोलगट चवऱ्यांप्रमाणे धोकादायक चवरे या डांबरी रस्त्यावर पडले आहेत. खड्ड्यांच्या परिभाषेच्या बाहेरील ते आहेत. रस्ता कमी अन्  खड्डे आणि चवऱ्यांमधून वाहन काढताना वाहनचालकांसह पादचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे.चिखलदऱ्याला परतवाडा शहरातून दोन मार्ग जातात. यातील अचलपूर-घटांग-सलोना हा ४८.२८ किलोमीटर (३० मैल) चा पहिला व सर्वांत जुना मार्ग. इंग्रज या रस्त्यानेच चिखलदऱ्याला जाणे पसंत करायचे. घोडागाडीने ते जायचे. घटांगच्या रेस्टहाऊसवर त्यांचा मुक्काम राहायचा. या मार्गानेच स्टिव्हन्सन सैन्य घेऊन लवादा व तेथून गाविलगडावर दाखल झाला होता. दुसरा रस्ता धामणगाव गढी-मोथा मार्गे ३४ किलोमीटर (२१ मैल) चा आहे. जनरल वेलेस्लीने १८०३ मध्ये हा मार्ग शोधून काढला. चिखलदऱ्याकरिता हा जवळचा मार्ग असून, पर्यटकांची त्यास पसंती आहे. याच जवळच्या मार्गाला बांधकाम विभागाचे तत्कालीन सचिव धनंजय धवड यांच्याकडून राजाश्रय मिळाला. हा मार्ग राज्य महामार्ग ३०५, तर इंग्रजांच्या वहिवाटीतील पहिला मार्ग हा प्रमुख जिल्हा मार्ग ८ म्हणून ओळखला जातो. 

मान्यता मिळूनही काम नाहीपर्यटननगरीकडे जाणाऱ्या या दोन्ही प्रमुख मार्गांच्या कामाला वन व वन्यजीव विभागाने १९ ऑक्टोबर २०२० रोजी मान्यता दिली. रस्त्याचे रुंदीकरण न करता आहे त्या स्थितीत मजबुतीकरणासह डांबरीकरणास मान्यता आहे. मान्यता मिळूनही या उद्ध्वस्त रस्त्याच्या कामास वृत्त लिहिस्तोवर सुरुवात झालेली नाही.  

टॅग्स :tourismपर्यटन