अल्पवयीन मुलींच्या विक्री प्रकरणात दोघांना अटक
By Admin | Updated: January 31, 2016 00:23 IST2016-01-31T00:23:07+5:302016-01-31T00:23:07+5:30
शिरपूर येथील दोन मुलींना मध्यप्रदेशात विकल्याप्रकरणी शनिवारी आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली.

अल्पवयीन मुलींच्या विक्री प्रकरणात दोघांना अटक
धारणी : शिरपूर येथील दोन मुलींना मध्यप्रदेशात विकल्याप्रकरणी शनिवारी आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली. यापूर्वी पाच आरोपींना पोलीस कोठडी दिली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये गोपाल जयराम पाटीदा व त्याचा मोठा भाऊ दिनेशचा समावेश आहे. दोन्ही आरोपी
अल्पवयीन मुलीचे दिनेशने आपला लहान भाऊ गोपालसोबत लग्न लावून दिले होते. या व्यवहारापोटी दिनेशने त्या मुलीच्या आई-वडिलांना ५० हजार रूपये दिले होते. ही रक्कम पोलिसांनी तपासाअंती जप्त केली. हीच रकम त्या अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांना देण्यासाठी रामावतार मालवीय आपल्या पत्नीसह शिरपूर येथे बुधवारी सकाळी आला होता. दोघांना कारसह पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ‘ह्या’ अल्पवयीन मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी अमरावतीला पाठविले जाईल. याप्रकरणी पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे कलम वाढविले असून मुलीची वैद्यकीय तपासणीनंतर पीओसीएसओ कायद्यांतर्गत कलमात वाढ होण्याची शक्यता एपीआय ताठे यांनी वर्तविली.