बोर्डी नदीला हिवाळ्यात पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 06:00 IST2019-11-09T06:00:00+5:302019-11-09T06:00:56+5:30
तालुक्यातील वडनेरगंगाई येथे गुरुवारी सायंकाळी अचानक मुसळधार पाऊस झाल्याने अनेक शेतकºयांच्या शेतामधील पीक खरडून गेले. नदीकाठावरील शेतात कापून ठेवलेले सोयाबीनचे पीक तसेच ज्वारीचे धांडे बोर्डी नदीच्या पुरात शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोरून गेले. या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अक्षरश: पाणी आल्याचे चित्र परिसरात शुक्रवारी दिवसभर होते.

बोर्डी नदीला हिवाळ्यात पूर
लोकमत न्यूज नेटवर्क
येवदा : नजीकच्या वडनेरगंगाई परिसरात गुरुवारी पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली. सोयाबीन सडल्यानंतर आता जमिनीत ओल असल्यामुळे कपाशी पीक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. खरिपातील एकही पीक हाती लागले नसल्याने जगावे कसे, असा सवाल करीत शेतकऱ्यांनी डोळ्यांतील अश्रूंना वाट मोकळी केली आहे.
तालुक्यातील वडनेरगंगाई येथे गुरुवारी सायंकाळी अचानक मुसळधार पाऊस झाल्याने अनेक शेतकºयांच्या शेतामधील पीक खरडून गेले. नदीकाठावरील शेतात कापून ठेवलेले सोयाबीनचे पीक तसेच ज्वारीचे धांडे बोर्डी नदीच्या पुरात शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोरून गेले. या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अक्षरश: पाणी आल्याचे चित्र परिसरात शुक्रवारी दिवसभर होते. वडनेर गंगाई, राजखेड, वरूड कुलट, कातखेड, पिंपळोद, सांगळूद, अंतरगाव, उमरी यांसारख्या गावाची तीच स्थिती आहे. शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेले मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी अतिपावसाने शेतातच खराब झाले.
पांढरे सोनेही धोक्यात
अतिपावसाने कपाशीचे पीक खराब होत आहे. या पिकात शेतकऱ्यांनी डवरणी केली. खते, औषधी दिली. मात्र, अधिक पावसाने पात्या जमिनीवर गळत असून, बोंडे सडण्याच्या मार्गावर आहेत.
विमा कंपन्या बेपत्ता
शासनाच्या आदेशाप्रमाणे शेतशिवारात कृषी व महसूल विभाग नुकसानग्रस्त शेताचे सर्वेक्षण करीत आहे. मात्र, विमा कंपन्या व त्यांचे प्रतिनिधी बेपत्ता असल्याने शेतकरी मदतीविषयी साशंक आहेत.