जलशिवार योजना ठरली शेतकऱ्यांसाठी वरदान

By Admin | Updated: August 9, 2015 23:58 IST2015-08-09T23:58:46+5:302015-08-09T23:58:46+5:30

अत्यंत कमी कालावधीत परंतु योग्य नियोजन साधून धारणी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने डझनावर सिमेंट बंधारे बांधून नाल्यालगतच्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले आहे.

A boon for the farmers of Jalshidwar scheme | जलशिवार योजना ठरली शेतकऱ्यांसाठी वरदान

जलशिवार योजना ठरली शेतकऱ्यांसाठी वरदान

बंधाऱ्यांनी फुलविले हास्य : धारणी तालुक्यात होणार हरितक्रांती
श्यामकांत पाण्डेय धारणी
अत्यंत कमी कालावधीत परंतु योग्य नियोजन साधून धारणी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने डझनावर सिमेंट बंधारे बांधून नाल्यालगतच्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले आहे. येत्या रबी हंगामात सिंचनाची सोय उपलब्ध झाल्याने आता आपली मागील चार वर्षांपासून होत असलेल्या नापिकीवर मलम लावले जाण्याचा आनंद मेळघाटातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.
मुख्यमंत्र्यांनी डिसेंबर महिन्यात ‘जलशिवार योजना’ आणली. त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी जून महिना आला. या पावसाळ्यापूर्वी जलशिवाराच्या माध्यमातून नाल्यांवर सिमेंट बंधारे बांधण्याचे आवाहान जिल्हाधिकाऱ्यांसमोर होते. त्यांनी वारंवार तातडीच्या बैठका बोेलावून सर्व विभागांशी सांगड घालून सिमेंट नाला बंधारा, तलावातील गाळ उपसणे, विहिरींचे बांधकाम करणे ्अशी कामे हाती घेऊन ते जून महिन्यापर्यंत पूर्णत्वास नेण्याचे आवाहन केले.
विशेष म्हणजे, जवळपास सर्वच विभागाने या आवाहनाला स्वीकारुन आपल्या परिने पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त कामे करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे परिणामही दिसू व जाणवू लागले आहेत.
कृषी विभागाने पूर्वीच नाला सुरळीकरणासाठी महत्त्वपूर्ण कामे पूर्ण केली होती. त्या नाल्यांवर सीएनबी सिमेंट नाला बांधाची निर्मितीसुध्दा केली. आता हे नाले तुडूंब भरले असून याचा लाभ लगतच्या शेतकऱ्यांना रबी हंगामात होणार आहे. कृषी अधिकारी पी.सी. दीक्षित यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी अरुण बेठेकर, सी.टी. लिंगोट आणि अ‍े.एम. बदखल यांनी मिळून १२ सीएनबी बंधारे तयार केले आहेत.
यामध्ये धारणी तालुक्यातील बैरागड -३, चुरिया -३, उतावली -२, कुसुमकोट-२, बारु १ व पाडीदम -१ यांचा समावेश आहे. या कामामुळे सुरु करण्यात आलेल्या जलशिवार योजेनची भविष्यात चांगली वाटचाल असणार, असा आशावाद मेळघाटातील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे मेळघाटातील शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

Web Title: A boon for the farmers of Jalshidwar scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.