हेल्मेट वापरासाठी दुचाकी चालकांकडून बंधपत्र
By Admin | Updated: January 24, 2015 22:46 IST2015-01-24T22:46:25+5:302015-01-24T22:46:25+5:30
परिवहन आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर महेश झगडे यांनी पहिले आरटीओ कार्यालयातील एजंटाना घरचा रस्ता दाखविला. त्याची अंमलबजावणी होत असताना आता दुचाकी

हेल्मेट वापरासाठी दुचाकी चालकांकडून बंधपत्र
अमरावती : परिवहन आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर महेश झगडे यांनी पहिले आरटीओ कार्यालयातील एजंटाना घरचा रस्ता दाखविला. त्याची अंमलबजावणी होत असताना आता दुचाकी वाहन परवान्यासाठी येणाऱ्या वाहन चालकाकडून हेल्मेट वापराविषयीचे बंधपत्र घेण्याचे लेखी आदेश दिले आहेत त्यामुळे आरटीओ कार्यालयात आता वाहन परवान्यासाठी येणाऱ्या दुचाकी चालकाकडून हेल्मेट वापराविषयीचे बंधपत्र घेतल्या जात आहे.
परिवहन आयुक्त झगडे यांनी राज्यातील सर्वच प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना २१ जानेवारी २०१५ रोजी लेखी पत्र दिले आहे. दुचाकी वाहन चालवित असताना हेल्मेट परिधान करण्याविषयी मोटर वाहन कायदा १९८८ चा नियम १२९ व महाराष्ट्र मोटर वाहन नियम १९८९ च्या नियम १९८९ च्या नियम २५० मध्ये तशी तरतूद करण्यात आली आहे. दुचाकी वाहन चालकांच्या तसेच त्यांच्या मागे बसून प्रवास करणाऱ्या व्यक्तीनेही हेल्मेट वापरण्याची कायद्यात तरतूद करण्यात आली आहे.
केवळ कायद्याची तरतूद म्हणून हा निर्णय नसून सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट आवश्यक आहे. याविषयीचा आदेश २१ जानेवारीला अमरावती कार्यालयाला प्राप्त आहेत. (प्रतिनिधी)