शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठाचा बोगस कारभार; सात वर्षांत १०० कोटींचा खर्च

By गणेश वासनिक | Updated: March 28, 2023 19:01 IST

Amravati News संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने गत सात वर्षांत जनरल फंडातून तब्बल १०० कोटींचा अनावश्यक खर्च केल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे.

गणेश वासनिक अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने गत सात वर्षांत जनरल फंडातून तब्बल १०० कोटींचा अनावश्यक खर्च केल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. अनावश्यक शैक्षणिक विभाग, योजना आणि कार्यक्रमांवर खर्च हा जनरल फंडातून करण्यात आला आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचे वेतनासाठी ‘एफडी’ रकमेच्या व्याजाची प्रतीक्षा करावी लागत आहे.दि. १५ मार्च रोजी झालेल्या सिनेट सभेत जनरल फंडाचे वास्तव पुढे आले.

हल्ली विद्यापीठाचा कारभार ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपया’ असा सुरू आहे. गत पाच वर्षांत अधिकाऱ्यांनी नवीन योजना, शैक्षणिक विभाग, तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची नियुक्ती, आउंटसोर्सिंगचा बेसुमार खर्च, ऑनलाइन कामांसाठी एजन्सी, परीक्षांचे ऑनलाइन कामांसाठी माईंड लॉजिक, प्रोमार्क या बाह्य यंत्रणेवर खर्च, स्वयंअर्थसाहाय्य योजना अथवा नव्या शैक्षणिक विभागांवर जनरल फंडातूनच खर्च केला जात असल्याची माहिती आहे. दरमहा अधिकारी-कर्मचाऱ्यांवर वेतनासाठी कधीकधी जनरल फंडाचा वापर होत केला जातो. ऑगस्ट २०१५ मध्ये जनरल फंडात १०७ कोटी असताना आजमितीला ४८ लाख शिल्लक असल्याचे वास्तव आहे. जनरल फंडात विद्यार्थी शुल्क, व्याज, केंद्रीय प्रवेश शुल्क व अन्य शुल्कातून येणारी रक्कम जमा होते. मात्र, गत सात वर्षांत जनरल फंडातून झालेला खर्च बघता ही उधळपट्टी कशी रोखणार? असा सवाल उपस्थित होत आहे, तर जनरल फंडाची दयनीय अवस्था असल्याचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना अधिसभेत सांगावे लागले, हे विशेष.इतर विद्यापीठाच्या तुलनेत अमरावती विद्यापीठात फार काही निधी जमा नाही. कामकाज चालत आहे. परीक्षा, प्रवेश शुल्क जैसे-थे आहे, यात कोणतीही वाढ केली नाही. उत्पन्न मर्यादित असून, खर्च वाढलेला आहे. आता विद्यापीठाच्या उत्पन्नात वाढ करणे काळाची गरज आहे.- डॉ. नितीन कोळी, प्रभारी वित्त व लेखाधिकारी, अमरावतीसन २०१५ मध्ये व्यवस्थापन परिषदेवर सदस्य असताना त्यावेळी सामान्य निधीत १०७ कोटींचा निधी शिल्लक असल्याचे विद्यापीठाने प्रमाणित पत्र दिले होते. मात्र, गत ४ त ५ वर्षांत सामान्य निधीची अक्षरश: उधळपट्टी करण्यात आली. १५ मार्च रोजीच्या सिनेट सभेत कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी या निधीची दयनीय अवस्था असल्याचे सांगितले. हा सर्व प्रकार ढिसाळ नियोजनाचा नमुना आहे.- डॉ. प्रवीण रघुवंशी, सदस्य, व्यवस्थापन परिषद, अमरावती विद्यापीठ.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र