भुलेश्वरीत वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:12 IST2021-07-26T04:12:05+5:302021-07-26T04:12:05+5:30
अमरावती - भुलेश्वरी नदीपात्रात शनिवारी वाहून गेलेल्या शिंदी बु. येथील युवकाचा मृतदेह रविवारी सकाळी शोध मोहिमेदरम्यान बंधाऱ्याजवळ आढळून ...

भुलेश्वरीत वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला
अमरावती - भुलेश्वरी नदीपात्रात शनिवारी वाहून गेलेल्या शिंदी बु. येथील युवकाचा मृतदेह रविवारी सकाळी शोध मोहिमेदरम्यान बंधाऱ्याजवळ आढळून आला.
प्राप्त माहितीनुसार, ओमप्रकाश महादेव महल्ले (३५) हा युवक भुलेश्वरी
शनिवारला भुलेश्वरी लघुप्रकल्पाच्या उगमावर झालेल्या मुसळधार पावसामुळे भुलेश्वरी धरण ओव्हर फ्लो होऊन दोन्ही काठांनी नदी तुडुंब वाहत होती. अचानक आलेल्या पुरामध्ये ओमप्रकाश महादेव महल्ले (३५) हा युवक शनिवारी सायंकाळी वाहून गेला. तहसीलदार, पोलीस प्रशासन व एसडीआरएफचे बचाव पथक घटनास्थळी दाखल होऊन शोधमोहीम सुरू केली. मात्र, नदीला मोठा पूर असल्याने मृताचा थांगपत्ता लागला नाही. रविवारी सकाळीच शोधमोहीम सुरू केली असता, शिंदी बु. येथील स्मशानभूमीजवळ असलेल्या बंधाऱ्याजवळ मृतदेह आढळून आला. उत्तरीय तपासणीसाठी तो मृतदेह अचलपूर रुग्णालयात पाठविण्यात आला. ओमप्रकाश महल्ले यांच्या पश्चात दोन मुली, पत्नी, वडील, भाऊ असा आप्तपरिवार असल्याची माहिती पोलीस पाटील नितीन गोरले यांनी दिली.