२२ तासानंतर मिळाला तरूणाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 05:00 IST2020-09-03T05:00:00+5:302020-09-03T05:00:07+5:30
तुळजापूर गढी येथील १७ वर्षीय फैजन अन्वर सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास जनावर चराईकरीता गेला असता, पाय घसरून नदीपात्रात पडला. सोबतच्या मित्रांना पोहणे येत नसल्याने त्यांनी गावात जाऊन घटनेची माहिती दिली. तहसीलदार अभिजित जगताप, बिडीओ प्रफुल्ल भोरगडे, चांदुर बाजारचे ठाणेदार दीपक वाळवी यांनी नदीला पूर असल्यामुळे अमरावती येथून बचाव व शोध मोहीम पथकाला पाचारण केले.

२२ तासानंतर मिळाला तरूणाचा मृतदेह
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदुर बाजार : तालुक्यातील तुळजापूर गढी येथील नदीला आलेल्या पुरात फैयाज अन्वर नामक युवक वाहून गेला होता. अखेर २२ तासानंतर मंगळवारी शोध व बचाव पथकाला त्याचा मृतदेह शोधण्यात यश मिळाले.
तुळजापूर गढी येथील १७ वर्षीय फैजन अन्वर सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास जनावर चराईकरीता गेला असता, पाय घसरून नदीपात्रात पडला. सोबतच्या मित्रांना पोहणे येत नसल्याने त्यांनी गावात जाऊन घटनेची माहिती दिली. तहसीलदार अभिजित जगताप, बिडीओ प्रफुल्ल भोरगडे, चांदुर बाजारचे ठाणेदार दीपक वाळवी यांनी नदीला पूर असल्यामुळे अमरावती येथून बचाव व शोध मोहीम पथकाला पाचारण केले. मात्र सोमवारी अंधार पडल्याने १ सप्टेंबरला सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. अखेर तुळजापूर गढीलगतच्या कोतगावंडी या गावाजवळ मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास फयाज अन्वरचा मृतदेह आढळला. या शोध व बचाव पथकात हेमंत सरकटे, योगेश घाडगे, कौस्तुभ वैद्य, देवानंद भुजाडे, सचिन धरमकर, अर्जुन सुंदरडे, दीपक डोरस, संदीप पाटील, उदय मोरे, राजेंद्र शाहाकार, अजय आसोले, प्रफुल्ल भुसारी, महेश मांदाळे, वाहिद शेखसह लक्ष्मणराव नांदणे यांचा समावेश होता.