शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

कृषी महाविद्यालय परिसरात नागपूरच्या महिलेचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 05:00 IST

चार वर्षीय चिमुकल्याचे बोबडे बोल व अन्य माहितीवरून मृताची ओळख तनुश्री सागर करलुके (३२, रा. रूईखैरी, पोस्टे. बुटीबोरी, जि. नागपूर) अशी पटविण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, तनुश्री ही पतीसोबत वाद झाल्याने दोन्ही चिमुकल्यांना घेऊन घराबाहेर पडली होती. बुटीबोरी पोलीस ठाण्यात त्याबाबत ‘मिसिंग’ची तक्रारदेखील नोंद आहे. दरम्यान, तिचा मृतदेह आढळल्याची माहिती बुटीबोरी ठाण्याला देण्यात आली असून, तिच्या नातेवाईकांना तसे कळविण्याची सूचना देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नागपूर रोडवरील शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या इमारतीच्या मागील बाजूला एका विवाहितेचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास ही घटना उघड झाली. तेथे कार्यरत चौकीदाराला मुलाच्या रडण्याचा आवाज आला. त्या दिशेने जाताना त्याला मागील बाजूने एका ३० ते ३२ वर्षे वयोगटातील महिलेचा मृतदेह दिसून आला, तर अंदाजे १० महिने वयाची चिमुकली आईच्या मृतदेहाला बिलगली होती. तसेच लागलीच चार वर्षे वयाचा मुलगादेखील तेथे आढळून आला. मुलाच्या सांगण्यावरून त्या दोन्ही चिमुकल्यांची ती आई होती.चार वर्षीय चिमुकल्याचे बोबडे बोल व अन्य माहितीवरून मृताची ओळख तनुश्री सागर करलुके (३२, रा. रूईखैरी, पोस्टे. बुटीबोरी, जि. नागपूर) अशी पटविण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, तनुश्री ही पतीसोबत वाद झाल्याने दोन्ही चिमुकल्यांना घेऊन घराबाहेर पडली होती. बुटीबोरी पोलीस ठाण्यात त्याबाबत ‘मिसिंग’ची तक्रारदेखील नोंद आहे. दरम्यान, तिचा मृतदेह आढळल्याची माहिती बुटीबोरी ठाण्याला देण्यात आली असून, तिच्या नातेवाईकांना तसे कळविण्याची सूचना देण्यात आली आहे. आईच्या मृतदेहाला बिलगलेल्या चिमुकलीचे नाव केतकी तर, तिच्या चार वर्षीय भावाचे नाव रूद्र असे सांगण्यात आले आहे. दरम्यान याप्रकरणी कृषी महाविद्यालयाचे प्रभारी अधीक्षक संजय गडलिंग यांनी शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास तक्रार नोंदविली.

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी मृत तनुश्री ही नागपूर जिल्ह्यातील असल्याने ती मुलांसमवेत नेमकी अमरावतीत कशी आली, याचा शोध घेतला जात आहे. ती कदाचित ट्रॅव्हल्सने आली असावी. वेलकम पॉइंटवर उतरून ती कृषी महाविद्यालयात गेली असावी, या दिशेने पोलीस तपास करीत आहेत. कृृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे रंगकाम सुरू असल्याने तेथे सीसीटीव्ही नव्हते. त्या भागातील अन्य सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे.

चिमुकल्या रूद्रने नेले टेरेसवरमाहिती मिळताच उपायुक्त एम.एम.मकानदार, एसीपी पूनम पाटील व गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले हे घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तेथे रूद्रला बोलते केले. तब्बल दोन-तीन तासानंतर त्याने आईचे व स्वत:चे नाव सांगितले. तो पोलिसांना इमारतीच्या टेरेसवर घेऊन गेला. तेथे तनुश्रीची पर्स व खाण्याचे काही साहित्य आढळून आले. तास दोन तास तो टेरेसवर घुटमळला. आई बोलत नाही, एवढेच त्याला कळत होते. 

हत्या की, आत्महत्या?तनुश्रीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी इर्विनच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. नातेवाईक आल्यानंतर शवविच्छेदन होईल. दरम्यान ती पतीसोबत वाद झाल्याने घराबाहेर पडल्याचे प्राथमिकरीत्या समोर आले आहे. आत्महत्या असेल, तर प्रथमदर्शनी घटनास्थळी तसे काहीच आढळून आले नाही. त्यामुळे पोलीस निष्कर्षाप्रत पोहोचलेली नाही. 

मृतदेहाची ओळख पटविण्यात आली आहेे. ती महिला नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रूईखैरी येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत बुटीबोरी पोलिसांना माहिती देण्यात आली. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण समोर येऊ शकेल.- पूनम पाटील, सहायक पोलीस आयुक्त

 

टॅग्स :Deathमृत्यू