‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:10 IST2021-06-11T04:10:24+5:302021-06-11T04:10:24+5:30

शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निंभी ते आसोना दरम्यान ८ जून रोजी सकाळी ७ वाजता दरम्यान अनोळखी ...

The body was identified | ‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली

‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली

शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निंभी ते आसोना दरम्यान ८ जून रोजी सकाळी ७ वाजता दरम्यान अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला होता. सदर मृतदेहाच्या डोक्याला जखमा होत्या. तसेच मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून चेहरासुद्धा विद्रूप करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य पाहून अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, एसडीपीओ कविता फरतडे यांनी घटनास्थळावर मृतदेहाची पाहणी केली. पंचनामा करून सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. पोलिस पाटलाच्या तक्रारीवरून व शवविच्छेदनाच्या अहवालावरून शिरखेड पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. पण, नेमका हा मृतदेह कुणाचा पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. शिरखेड पोलिसांच्या वतीने मृतदेहाची ओळख पटावी, म्हणून शोधपत्रिका तयार करण्यात आली होती. तांत्रिक तपास करत मृताची ओळख पटविण्यात आली.

Web Title: The body was identified