नवाथे चौकात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:13 IST2021-04-10T04:13:34+5:302021-04-10T04:13:34+5:30
अमरावती : नवाथेनगर चौकात गुरुवारी एका ४५ ते ५० वर्षे वयोगटातील अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. नवाथे चौक स्थित ...

नवाथे चौकात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला
अमरावती : नवाथेनगर चौकात गुरुवारी एका ४५ ते ५० वर्षे वयोगटातील अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. नवाथे चौक स्थित आशादीप अपार्टमेंटजवळ एक व्यक्ती मृतावस्थेत पडल्याची माहिती राजापेठ पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह उचलून जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. या प्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पोलीस मृताच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.
00000000000000000000000000
एअर गन हातात घेऊन फिरणारा अटकेत
अमरावती: एअर गन हातात घेऊन बिनधास्त फिरणाऱ्या एका तरुणाला खोलापुरी गेट पोलिसांनी युवा स्वाभिमाननगरातील झोपडपट्टीतून अटक केली.
अमर विठ्ठल लसनकुटे (महाजन) (२५ रा. युवा स्वाभिमाननगर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून काळ्या रंगाची मेटल बॉडी असलेली २२ सेमी. लांबीची एअर गन जप्त केली आहे. ती एअर गन १ हजार २७८ रुपयात ऑनलाईन खरेदी केल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. या घटनेच्या तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी आरोपी अमर लसनकुटेविरुध्द कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा नोंदविला.
000000000000000000000000000000000
वाहतुकीस अडथळा केल्याने दोघांविरुध्द गुन्हा
अमरावती : सार्वजनिक रस्त्यावर ऑटो उभे करून वाहतुकीस अडथळा केल्याने कोतवाली पोलिसांनी गुरुवारी दोन चालकांविरुध्द भादंविच्या कलम २८३ अन्वये गुन्हा नोंदविला.
मुजीब अहमद खान अकसर खान (३३ रा. जुनीवस्ती, बडनेरा) आणि वसिम खान अजीम खान (२४, बडनेरा) अशी आरोपींची नावे आहेत. कोतवालीचे पोलिस उपनिरीक्षक गुलतकर यांचे पथक शाम चौकात पेट्रोलिंग करीत असताना, त्यांना ऑटो क्रमांक एमएच २७ एएफ ९३५८ आणि एमएच २७ बीडब्ल्यु ३९२६ हे रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा करीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही ऑटोचालकाविरुध्द गुन्हा नोंदविला.