जत्रा डोहात बुडालेल्या पर्यटकाचा मृतदेह काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:13 IST2021-07-25T04:13:06+5:302021-07-25T04:13:06+5:30

खुर्शी नदीच्या पुरात वाहून गेला आदिवासी युवक, उपचारासाठी नेत असताना मृत्यू चिखलदरा : शेतातून घरी जात असताना मुसळधार पावसाचे ...

The body of a tourist drowned in Jatra Doha was recovered | जत्रा डोहात बुडालेल्या पर्यटकाचा मृतदेह काढला

जत्रा डोहात बुडालेल्या पर्यटकाचा मृतदेह काढला

खुर्शी नदीच्या पुरात वाहून गेला आदिवासी युवक, उपचारासाठी नेत असताना मृत्यू

चिखलदरा : शेतातून घरी जात असताना मुसळधार पावसाचे पाणी कोसळल्याने खुर्शी नदीला आलेल्या पुरात आदिवासी युवक वाहून गेला. गावकऱ्यांनी त्याला बाहेर काढले. मात्र, उपचारार्थ दाखल करीत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. शनिवारी ही घटना घडली. दुसऱ्या एका घटनेत शुक्रवारी सायंकाळी चिखलदरा पर्यटनस्थळावरील जत्रा डोह येथे बुडालेल्या युवकाचा मृतदेह शनिवारी पहाटे काढण्यात आला.

मंगेश हिरालाल अखंडे (२५, रा. बारुगव्हाण, ता. चिखलदरा) येथील हा युवक शेतातून घरी येताना शनिवारी खुर्शी नदीच्या पुरात वाहून गेला. गावकऱ्यांनी त्याला पाण्यातुन काढले, पण उपचाराकरीता परतवाडा येथे नेत असताना बहिरमजवळ त्याचा मृत्यू झाला. चुरणी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह परिजनांच्या ताब्यात देण्यात आला.

बॉक्स

अकोल्याच्या पर्यटकांचा मृतदेह सापडला

चिखलदऱ्याला पर्यटनासाठी आलेल्या अकोला जिल्ह्याच्या हिवरखेड येथील समीर बेग शकीर बेग (२२) या युवकाचा जत्राडोह येथील कुंडात शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता बुडाला होता. त्याचा मृतदेह शनिवारी पहाटे ६ वाजता शोधमोहिमेनंतर पोलिसांनी काढला. शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

Web Title: The body of a tourist drowned in Jatra Doha was recovered