शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

वाहनात फसला चालकाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 6:00 AM

दरम्यान, पहाटे ४ वाजताच्या सुमारास नागपूरकडून अकोलाकडे जाणाऱ्या भरधाव ट्रक (एमएच ४० बीएल ५४२४) ने उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. त्याचवेळी मागून भरधाव येणाऱ्या एमएच ४० एके १५२३ या क्रमांकाचा ट्रकसुद्धा अपघातग्रस्त ट्रकवर जाऊन धडकला. या विचित्र अपघातात एमएच ४० एके १५२३ क्रमांकाच्या ट्रकचा चालक झाकरू नेवारेचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देविचित्र अपघात : तपोवन स्थित सुपर हाय-वे ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गाडगेनगर हद्दीतील तपोवन स्थित एक्सप्रेस हायवेवर उभ्या दहाचाकी ट्रकवर दोन ट्रक धडकल्याने एकाचा चालक ठार झाला. झाकरू अंतुजी नेवारे (४५, रा. दुर्गा धामणा, जि. नागपूर) असे मृताचे नाव आहे. अपघातानंतर ट्रकच्या केबिनमध्ये चालकाचा मृतदेह फसला होता. त्यामुळे अग्निशमन विभागाच्या मदतीने कटर मशीनद्वारे केबिन कापून मृतदेह बाहेर काढण्यात आला.पोलीस सूत्रानुसार, ट्रक क्रमांक एमएच २७ बीएक्स ७३७३ नागपूरकडून अकोलाकडे जात असताना तपोवनजवळील महामार्गावर बिघडला. ट्रकचालकाने साइन बोर्ड किंवा इंडिकेटर सुरू न ठेवता अर्ध्या रस्त्यात ट्रक उभा केला आणि केबिनमध्ये झोपला.दरम्यान, पहाटे ४ वाजताच्या सुमारास नागपूरकडून अकोलाकडे जाणाऱ्या भरधाव ट्रक (एमएच ४० बीएल ५४२४) ने उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. त्याचवेळी मागून भरधाव येणाऱ्या एमएच ४० एके १५२३ या क्रमांकाचा ट्रकसुद्धा अपघातग्रस्त ट्रकवर जाऊन धडकला. या विचित्र अपघातात एमएच ४० एके १५२३ क्रमांकाच्या ट्रकचा चालक झाकरू नेवारेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेच्या माहितीवरून गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अपघातात ट्रकचालक कॅबीनमध्ये फसला होता. त्यामुळे त्याला बाहेर काढणे कठीण झाले होते. त्यामुळे घटनास्थळी अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले.अग्निशमन विभागाचे राजू शेंडे, नितीन इंगोले, फायरमन मनोज इंगोले, विशाल भगत, विकी हिवराळे यांनी हायड्रॉलिक कटर मशीनच्या साहाय्याने केबिन कापून झाकरू नेवारे यांचा मृतदेह बाहेर काढला. त्यासाठी काही तासांचा अवधी लागला. तोपर्यंत या अपघातामुळे घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी जमली तसेच काही वेळापुरती वाहतूक ठप्प झाली होती.अपघाताची फिर्याद किशोर छत्रपती मेश्राम (४०, रा. आंबेडकरनगर) यांनी गाडगेनगर पोलिसांत नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी ट्रक क्रमांक एमएच २७ बीएक्स ७३७३ व ट्रक क्रमांक एमएच ४० बीएल ५४२४ च्या चालकांविरुद्ध भादंविच्या कलम ३०४ (अ), २७९ अन्वये गुन्हा नोंदविला. या घटनेचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष तोकलवाड यांच्याकडून करण्यात आला.

टॅग्स :Accidentअपघात